काेराेना से डराे ना ! इथं तर जिवंत युवकालाच मेल्याचा आला फाेन

Call
CallSakal

सातारा : कोविड 19 रुग्ण संख्येच्या (covid19 patients number) गोंधळानंतर आता चक्क जीवंत माणसाला कोरोनामुळे मृत (died) झाल्याचे घोषित करण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात घडली आहे. हा प्रकार फलटण (phaltan) शहरामध्ये घडला असून एकच खळबळ उडाली आहे. कोरोनावरील (coronavirus) उपचार घेऊन बरा झालेल्या युवकास (youth) त्याचाच कोरोनाने मृत्यू झाल्याचा दूरध्वनी आल्याने युवकासह त्याच्या कुटुंबीयास धक्का बसला आहे. (satara-marathi-news-health-department-phone-call-about-his-death-covid19-phaltan)

फलटण शहरातील या युवकाची गेल्या महिन्यात कोविड 19 ची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. गेल्या महिन्यांपासून त्याने त्याचे दैनंदिन कामकाजास सुरु केले होते. सोमवारी (ता.सात) त्यास एक दूरध्वनी आला. त्याने घेताच पलीकडून त्याला त्याचे कोविडने निधन झाल्याचे ऐकायला मिळाले. हा दूरध्वनी फलटण नागरी आरोग्य सुविधा केंद्रातून आला होता. त्याने संबंधित महिलेचे वाक्‍य ऐकताच ए आई हे बघ काय म्हणताहेत असे म्हणत आईकडे मोबाईल दिला. त्याच्या आईला देखील तसेच सांगण्यात आले.

Call
सातारा जिल्ह्यातील २७ गावे लाॅक; प्रशासनाचा निर्णय

त्यावर आईने अहो तुम्ही म्हणत आहात तो माझा मूलगा असून माझ्या समोरच उभा आहे. असे अभद्र बोलातना तुम्हांला काय वाटते का असे ठणकावून सांगितले. त्यावर पलीकडून हे काम फलटण पालिकेच्या आरोग्य नागरी सुविधामधून होत आहे. आम्ही मुद्दामहून काही सांगत नाही. आम्हांला हा निराेप द्या असे सांगण्यात आले. त्यावर आईने शांतपणे ठीक आहे मी पाहते काय ते असे सांगितले. त्यानंत त्या स्वतः मुलासमवेत फलटण आरोग्य पालिकेच्या नागरी सुविधात गेल्या. तेथे त्यांना जिल्हा रुग्णालयातील मृतांच्या यादीत नाव असल्याचे सांगण्यात आले.

त्यावर आईने आरोग्य विभागाच्या काराभाबाबत तेथेच तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान जिवंत मुलास मृत घोषित करण्याचा या प्रकाराने कुटुंबीयांस खूप मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1986 नागरिकांना मंगळवारी घरी सोडण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत 873975 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 176663 नागरिकांना काेराेनाची लागण झाली आहे. आजपर्यंत 159980 नागरिक काेराेनावरील उपचार घेऊन घरी परतले आहेत. याबराेबरच आजपर्यंत 3912 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 12629 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेताहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com