esakal | सातारा : शे-पाचशे घेऊन मृताचा चेहरा दाखविणा-यांची हाेणार चाैकशी
sakal

बोलून बातमी शोधा

500-Rupees

सातारा : शे-पाचशे घेऊन मृताचा चेहरा दाखविणा-यांची हाेणार चाैकशी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सातारा : कोरोनामुळे तुमच्या नातेवाईकाचा मृत्यू (covid19 patient death) झाला आहे. त्याला शेवटचे भेटण्यासाठी त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तुमचा जीव कासावीसा झालेला असताे. संबंधित व्यक्तीचा चेहरा नातेवाइकांना दाखविण्यासाठी पैसे मागितले जातात असा प्रकार साता-यातील जंम्बाे काेविड सेंटर (satara jumbo covid center) येथे घडत आहे. याबराेबरच जंम्बाे काेविड सेंटरमधील विविध चुकीचे प्रकार सातत्याने समाेर येत आहे. या प्रकारांची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी आता थाेडेसे का हाेईना गंभीर झाले आहेत. याच गांभीर्यातून मृत व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी पैसे मागत असलेल्या प्रकाराची प्रशासनाने दखल घेतली आहे. तत्कालीन प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी या प्रकाराची सखाेल चाैकशी करुन संबंधित कर्मचा-यांवर कारवाईची आदेश दिले आहेत. या प्रकाराची चाैकशीची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक आणि पालिका मुख्याधिकाऱ्यांवर साेपविण्यात आली आहे. (satara marathi news jumbo covid center malpractise enquiry)

काेराेनाच्या उपचारात साताऱ्यातील जंम्बो कोविड सेंटरचे नाव महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आहे. येथे उपचारासह रुग्णांना उत्तम सुविधा दिल्या जातात. परंतु, रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर नातेवाइकांना लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत सातत्याने प्रसिद्धी माध्यमांतून प्रकाश टाकला जात आहे. यामुळे येथील काही प्रकार बंद देखील झाले आहेत.

हेही वाचा: लाॅकडाउन संपण्यास 3 दिवसांचा अवधी; जिल्हाधिका-यांचा नवा आदेश

गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. मात्र, मृत्य व्यक्तीचे लोक भावनेमुळे शांत राहत हाेते. माध्यमांच्या वृत्ताची दखल घेऊन तत्कालीन प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी संबंधितांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

loading image
go to top