'कृष्णा'तील विजयासाठी संघर्ष अटळ; छुप्या राजकीय हालचालींना वेग

Krishna Sugar Factory
Krishna Sugar Factoryesakal

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्‍प्‍्यात आली आहे. उद्या (सोमवारी) जाहीर प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांत अत्यंत छुप्या अन् गोपनीय हालचालींना वेग आला आहे. छुप्या पद्धतीने पहिल्या, दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या राजकीय हालचालींनी वेग घेतल्यामुळे राजकीय तडजोडी वाढल्या आहेत. मतदानाअगोदरचे ४८ तास अत्यंत महत्त्‍वाचे आहेत. त्यामुळे मतदान होईपर्यंत तिन्ही पॅनेलचे नेते, उमेदवार, कार्यकर्ते एकमेकांवर पाळत ठेवून घडामोडी करत आहेत. (satara-marathi-news-krishna-sugar-factory-election-2021-meeting)

आपल्याकडे येणाऱ्याला भूमिका समजावून सांगणे, जाणाऱ्याला गद्दार ठरविण्याची रणनीती वेगात आहे. मंगळवारी (ता. २९) मतदान आहे. त्यापूर्वी २४ तास आज (सोमवारी) जाहीर प्रचाराची सांगता होत आहे. कृष्णा कारखान्यात सत्ताधारी भोसले गटाच्या सहकार पॅनेल विरुद्ध अविनाश मोहिते यांचे संस्थापक व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पनेलमध्ये जोरदार लढत आहे. पाच तालुक्यांतील १३२ गावांना गवसणी घालणारे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणूक आता चुरशीत सुरू आहे. अशा स्थितीत जनमताचा कौल घेणे फारच अवघड जाते. विजयासाठी तिन्ही पॅनेलने कंबर कसली आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे संघर्ष अटळ आहे. पार्टी फोडणे, कार्यकर्त्यांचे हृदयपरिवर्तन असे राजकारण गतीत आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर आता छुप्या प्रचाराला गती आली आहे.

Krishna Sugar Factory
मतदारांनाे! 'कृष्णा’ च्या निवडणुकीत असे करा मतदान

गावागावांत बॅनरबाजी, झेंडे लागले आहेत. प्रत्येकजण आपल्यापरिने विश्लेषण करत आहेत. पैजा लावल्या जात आहेत. विश्लेषण करताना नेत्यांच्या भूमिकांचीही चर्चा होत आहे. विजयासाठी तिन्ही गटांचा संघर्ष अटळ असल्याने कृष्णाकाठावरील वातावरण ढवळून निघाले आहे. भावनेच्या लाटेवर, वक्तृत्वावर सभा जिंकता येतात. निवडणुकीचे राजकारण वेगळे असते. सभेला येणाऱ्यांचे मतांत रूपांतर करण्याचे एक वेगळे आणि खास कौशल्य राजकारण्यांकडे असावे लागते. त्यासाठी व्यूहरचना आखण्याचे काम गतीत आले आहे. क्वचितप्रसंगी मनाविरुद्धही राजकीय तडजोडी होताना दिसत आहेत. त्या कराव्याही लागत आहेत. ज्या-ज्या वेळी सत्तांतर झाले, त्या प्रत्येक वेळी हेच कौशल्य दाखवून निवडणुका जिंकल्या गेल्या. यावेळी भावनेचे रूपांतर 'मतां'मध्ये करण्यात जो गट वरचढ ठरेल, तो बाजी मारणार, हे निश्चित. अर्थात घोडेमैदान दूर नाही. तरीही गटातटाच्या राजकारणाचे बरचसे पाणी पुलाखालून वाहिले आहे. इथून पुढे ४८ तासांतील राजकीय हालचालींनी खरा रंग भरणार आहे

Krishna Sugar Factory
दक्षिण काशी वाईतील श्री महागणपती (ढोल्या)

जाहीर, छुप्या भूमिकाही महत्त्‍वाच्या

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्‍या जाहीर व छुप्‍या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्याबाबत काहींनी स्पष्ट संकेत दिले आहेत. अद्यापही काही गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे त्याचीही जोरदार चर्चा आहे. शेवटच्या दोन दिवसांतील सभा, गाठीभेटीने कृष्णाचा महासंग्राम महत्त्‍वाचा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com