मतदारांनाे! 'कृष्णा’ च्या निवडणुकीत असे करा मतदान

Voting
Voting
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी पाचही तालुक्यांत १४८ मतदान केंद्रे आहेत. दोन्ही तालुक्यांतील २२ गावे संवदेनशील आहेत. त्यातील १५ गावे कऱ्हाड (karad) तालुक्यातील, तर वाळवा (walva) तालुक्यातील आठ आहेत. मंगळवारी (ता. २९) मतदान असल्याने त्यापूर्वी २४ तास आधी सोमवारी (ता. २८) सकाळी आठ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली. (satara-marathi-news-krishna-sugar-factory-election2021-voting-centers)

कारखान्यासाठी मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान आहे. कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ८६, वाळव्यात ५१, कडेगावला १०, तर खानापूरला एक मतदान केंद्र आहे. एका केंद्रावर २७० ते ३०० मतदानाची सोय आहे. मतदान केंद्रावर नऊ कर्मचारी व एक पोलिस नियुक्त केलेत. सहा गटांच्या सहा व राखीव गटाच्या चार अशा एकूण दहा मतपत्रिका आहेत. २१ शिक्के मारायचे आहेत.

Voting
मरण उशाला घेऊन आणखी किती पावसाळे काढायचे?; ग्रामस्थांचा संतप्त सवाल

मतदान प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी कऱ्हाड व वाळवा तालुक्यांतील ३५ मतदान केंद्रांना भेट दिली. ज्यादा मतदान आहे, तेथे बुथ वाढविण्याच्या त्यांनी सूचना केल्या. पोलिसांच्या माहितीनुसार कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वडगाव हवेली, कोडोली, बेलवडे बुद्र्रकु, काले, आटके, कार्वे, वाठार, विंग, पोतले, शेणोली, उंडाळे, कोळेवाडी, घारेवाडी, धोंडेवाडी, तर वाळवा तालुक्यातील नेर्ले, पेठ, बोरगाव, रेठरे हरणाक्ष, किल्ले मच्‍छिंद्रगड, कामेरी, लवंडमाची आदी गावे संवदेनशील आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र पोलिस बंदोबस्तही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com