लसीकरण केंद्र ठरताहेत सुपर स्प्रेडर; आमदार शिंदेंचा निष्कर्ष

कोरेगावात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की मतदारसंघात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या ठिकाणी आरटीपीसीआर, अँटीजेन टेस्टचे केंद्र व बाह्यरुग्ण विभाग एकाच ठिकाणी असून, तेथेच लसीकरण सुरू आहे. विशेषत: ग्रामीण भागातील लोक वाहनातून समूहाने लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये जात आहेत.
Mahesh Shinde
Mahesh Shindeesakal

कोरेगाव (जि. सातारा) : गेल्या दहा ते 15 दिवसांत शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये (coronavirus vacination center) पहिल्या लशीचा डोस घेतलेले अवघ्या पाचच दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह (covid positive) होऊ लागल्याचे त्यांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग (contact tracing) आणि ट्रॅव्हल हिस्ट्रीवरून (travel history) स्पष्ट झाले असून, जिल्हा आरोग्य विभाग डोळ्याला झापड लावून काम करत असल्याने सुपर स्प्रेडर (super spreader) बनू लागलेली या मतदारसंघातील ही शासनाची लसीकरण केंद्रे आरोग्य विभागाच्या इमारतीतून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये तातडीने स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी येथे केली. (satara marathi news mahesh shinde corona vaccination center super spreader)

कोरेगावात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की मतदारसंघात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या ठिकाणी आरटीपीसीआर, अँटीजेन टेस्टचे केंद्र व बाह्यरुग्ण विभाग एकाच ठिकाणी असून, तेथेच लसीकरण सुरू आहे. विशेषत: ग्रामीण भागातील लोक वाहनातून समूहाने लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये जात आहेत. तेथे कोरोना बाधितांचा संपर्क आल्यानंतर लस घेण्यास आलेल्यांना चार ते पाच दिवसांत कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याची शेकडो उदाहरणे मी गेला आठवडाभर पाहात आहे. कोरेगावातील उपजिल्हा रुग्णालयातील काडसिद्ध आणि जितराज मंगल कार्यालयातील काडसिद्धेश्‍वर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्यांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग व ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती घेतली असता, त्यांनी शासनाच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mahesh Shinde
काेराेनाने मृत्यू झाला असल्यास मिळते दाेन लाखांची रक्कम

याबाबत मी तत्काळ राज्य शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून ही लसीकरण केंद्रे आरोग्य केंद्राच्या ठिकाणांवरून तातडीने हलवण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी शासन निर्णयाकडे बोट दाखविले. त्यानंतर मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरेन्समध्ये हा विषय मांडला. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असला, तरी जिल्हा प्रशासन मात्र अपेक्षित गतीने काम करत नसल्यामुळे कोरोनाग्रस्तांचे प्रमाण वाढले असून, त्यास शासकीय लालफितीचा कारभार कारणीभूत आहे.

गेल्या पाच तारखेला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून लस घेऊन आल्यानंतर नेर (ता. खटाव) येथील एका ज्येष्ठ नागरिकामध्ये तीनच दिवसांत कोरोनाची लक्षणे दिसून आली आणि आज त्यांची ऑक्‍सिजनची पातळी एकदम खालावल्यावर उपचार करेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मुलाला देखील लसीकरण केल्यानंतरच कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याचे मी स्वत: पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आजच सकाळी आणून दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी सुनील खत्री, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, संतोष जाधव, राहुल प्र. बर्गे उपस्थित होते.

कोरेगाव मतदारसंघात कोरोना हॉस्पिटल्सची संख्या जास्त असली, तरी दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधितांवर उपचार करणे कोणा एका व्यक्तीला अथवा शासनालाही शक्‍य होणार नाही. तेवढी शासकीय यंत्रणाही नाही. सद्यःस्थितीत निर्णयाचे सर्वाधिकार असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना कागदोपत्री कामकाज करण्यातच आनंद असून, ते ग्रामीण भागात जाऊन काम करत नाहीत. त्यामुळे आता ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला असून, गावोगावच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. बोरजाईवाडीतून प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला आहे.''

- महेश शिंदे, आमदार

Mahesh Shinde
उदयनराजेंच्या कारभारावर शिवेंद्रसिंहराजे नाराज; खासदारांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट

satara marathi news mahesh shinde corona vaccination center super spreader

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com