esakal | आमदारांना टेंपोत बसवून त्या रस्त्यावर फेऱ्या मारा! नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

political leaders clipart

आमदारांना टेंपोत बसवून फेऱ्या मारा! नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

sakal_logo
By
संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : मायणी- दहिवडी रस्त्याचे भाग्य उजळण्यासाठी खटाव, माणच्या आमदारांना टेंपोत बसवून मायणी- दहिवडी रस्त्यावर साठच्या स्पीडने दोन, तीन फेऱ्या मारा, मग लगेच रस्त्याचे काम सुरू होईल, अशी उपरोधिक व संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे होत आहे. (satara-marathi-news-netizens-comments-on-social-media-about-mayni-dhaiwadi-road)

मायणी-दहिवडी रस्त्याची दुरवस्था आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्या, मध्येच आलेला फुगवटा अशांमुळे तो रस्ता नेहमीच लोकांच्या चर्चेत असतो. मात्र, नुकताच पुसेगाव ते म्हासुर्णे हा 30 किलोमीटरचा नवीन रस्ता एका दिवसात तयार करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मायणी- दहिवडी रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, त्या रस्त्यासाठी लिम्का बुक चालत नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: करुन दाखवलं; दिवसात 30 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण

खरं तर आमदारांना एखाद्या टेंपोमध्ये बसवून मायणी- दहिवडी रस्त्यावर दोन, तीन फेऱ्या मारायला पाहिजेत. म्हणजे त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना येईल. मायणी- दहिवडी रस्त्याचे काम तातडीने पुसेगाव- म्हासुर्णे रस्त्याच्या धर्तीवर पूर्ण करावे, अशी मागणीही केली जात आहे.

ब्लाॅग वाचा