करुन दाखवलं; दिवसात 30 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण

pusegoan - mashurne road construction
pusegoan - mashurne road constructionsystem

विसापूर (जि. सातारा) : पुसेगाव ते म्हासुर्णे (pusegoan - mahsurne) (एसएच-147) (state highway 147) या 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (public work department) माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने एका दिवसात करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (limca book of world record) होणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी दिली. हा विश्वविक्रम (world record) करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधींच्या कामगिरीचे कौतुक सर्व स्तरातून झाले. (satara-marathi-news pusegoan-mahsurne-30-km-road-constructed-in-day-limca-book-record)

रविवारी (ता.30) राजपथ इन्फ्राकॉनने या रस्त्याचे काम दिवसात पूर्ण करून विश्वविक्रम रचत महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त अनोखे अभिवादन केले. कंत्राटदार कंपनीच्या सुमारे 474 कामगार आणि 250 वाहनांच्या साह्याने यासाठी परिश्रम घेतले. हा विक्रम होताना याचे लाइव्ह चित्रीकरण लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या मुख्य टीमने पाहिले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा एक प्रतिनिधी या विश्वविक्रमाची नोंद घेण्यासाठी उपस्थित होता.

pusegoan - mashurne road construction
पुणे- सातारा प्रवास हाेणार सुखकर; आठ किलोमीटरचे अंतर होणार कमी

जगदीश कदम म्हणाले,"" पुसेगाव ते म्हासुर्णे या 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची निवड कंपनीने केली. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व अधिकारी आणि कर्मचारी विश्वविक्रम करण्याच्या ध्येयाने पछाडले होते. आज सकाळी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आम्ही 30 किलोमीटर रस्त्याचे काही भाग केले होते. प्रत्येक भागासाठी एक प्रोजेक्‍ट मॅनेजर आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्वांनी एकजुटीने काम करत विश्वविक्रम साकारण्याचे शिवधनुष्य पेलले. यापुढेही आम्ही महाराष्ट्राची मान उंचावेल, असे काम निश्‍चित करत राहू.''

या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता सदा साळुंके, श्री. मुंगळीवार, माजी अभियंता एस. पी. दराडे आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. राजपथ इन्फ्राकॉनच्या संचालिका मोहना कदम, संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

pusegoan - mashurne road construction
Video पहा : असा झाला 'ग्रिफॉन'चा 900 किलोमीटर प्रवास

सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रतिनिधी म्हणून मी आणि माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी आज 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामावर नजर ठेवली होती. जगदीश कदम आणि त्यांच्या टीमने दोन महिने नियोजन करून आणि आज दिवसभर परिश्रम करून विश्वविक्रमाला गवसणी घातली. या कामगिरीबद्दल कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे.

- उल्हास देबडवार, सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com