वाई तालुक्यात पुन्हा निघाले बगाड; 60 जणांवर गुन्हा दाखल

पांडे गावातील संशयितांसह 15 ते 20 अनोळखी लोकांनी भैरवनाथाचे बगाड काढून ते बैलजोड्यांच्या साह्याने व माणसांच्या मदतीने बगाड यात्रा काढून पांडे गावाकडे घेऊन येताना मिळून आले आहेत.
Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi Newssystem

भुईंज (जि. सातारा) : जिल्हाधिकाऱ्यांचा यात्राबंदी आदेश असतानाही तो डावलून भैरवनाथाचे बगाड (bagad) काढून त्यास बैलजोड्यांच्या साह्याने व माणसांच्या मदतीने पांडे (ता. वाई) गावाकडे घेऊन येताना 50 ते 60 जण मिळून आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अमोल पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पांडे (Pande village) गावातील संशयितांसह 15 ते 20 अनोळखी लोकांनी भैरवनाथाचे बगाड काढून ते बैलजोड्यांच्या (bullock cart) साह्याने व माणसांच्या मदतीने बगाड यात्रा काढून पांडे गावाकडे घेऊन येताना मिळून आले आहेत. satara marathi news pande wai bagad yatra

जिल्हाधिकारी यांनी दिलेला यात्राबंदी, जमावबंदी आदेश झुगारून व मुक्‍या प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याबद्दल संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यम राजेंद्र पवार, ओंकार दिलीप जाधव, आदित्य महेश खराडे, प्रसाद दशरथ जाधव, तुषार सावंत, गणेश अरुण यादव, हरिश्‍चंद्र रामराव पवार, कुणाल सुनील उंबरकर, सुदेश संजय जाधव, स्वप्निल महादेव यादव, बसाप्पा भीमराव पुजारी, ऋतुराज वसंत जाधव, सोहम सिंद्ध पुजारी, रोहन राजेंद्र जाधव, गणेश दीपक शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Satara Latest Marathi News
Good News : रत्नागिरीत भाजप उभारणार कोविड सेंटर; बाधितांना मोठा दिलासा

याबराेबरच आकाश सरणाप्पा पुजारी, प्रणव मानसिंग जाधव, हारुण हाजिमलंग इनामदार, परवेश करिम मुलाणी, अनिल केरबा जाधव, ओंकार मानसिंग ऊर्फ साहेबराव जाधव, आशिष शामराव खराडे, सागर रामचंद्र महामुनी, प्रवीण राजेंद्र जाधव, रोहन राजेंद्र पवार, संतोष हणमंत जाधव, यश अरविंद थोरात, प्रणव राजाराम जाधव, शेखर राजू लायगुडे, मंगेश सुरेश खराडे, भीमराव मलाप्पा पुजारी, गणेश प्रकाश पवार, यश प्रभाकर खराडे, यश सत्यवान जाधव, रोहित मनोहर खराडे, तसेच बगाडास बैल जोडणारे प्रवीण शिवाजी जाधव, दादासाहेब तात्याबा जाधव (सर्व रा. पांडे, ता. वाई) व अनोळखी 15 ते 20 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापूराव धायगुडे करीत आहेत.

Satara Latest Marathi News
पोलिसांच्या नाकावर टिचून वाईत बगाड यात्रा; बावधनातील 104 जणांवर गुन्हा, 83 जणांना अटक
Satara Latest Marathi News
कोयना नदीपात्रात सापडलेले बॉंब निकामी केले : अजयकुमार बन्सल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com