शिक्षकांसाठी जिल्हाधिका-यांनी दिला आदेश; तातडीने कार्यवाही करा

Teacher
Teacheresakal

सातारा : कोरोना रुग्णांच्या (covid19 patients) संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची (teachers) नियुक्ती करावी. शाळांना सुट्टी असल्यामुळे काही शिक्षक आपल्या गावी गेली असतील त्यांना तात्काळ मुख्यालया हजर राहण्याबाबत कळवावे अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी आज (गुरुवार) येथे केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात काेविड रुग्णांची वाढती संख्या थाेपविण्यासाठी एक जून पर्यंत लाॅकडाउन (lockdown) केले हाेते. त्यानंतरही रुग्ण संख्या कमी झाली नाही. त्यामुळे आठ जून पर्यंत लाॅकडाउन वाढविण्यात आले आहे. रुग्ण संख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पाेलिस यंत्रणेने कडक भुमिका घेतली आहे. (satara-marathi-news-shekhar-sinh-orders-teachers-for-covid19-patients-contact-tracing-survey)

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज (गुरुवार) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी उपस्थितांना काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी सूचना केल्या. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Teacher
उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेताच आशा सेविका पुन्हा घराघरांत!

सिंह म्हणाले ज्या गावातील शिक्षक आहे, त्याच गावात त्या शिक्षकाला कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी नियुक्ती करण्यात यावी. ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यांना काय काम करावयाचे याची सविस्तर माहिती द्यावी. शिक्षकांनी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची माहिती संबंधितांना द्यावी.

shekhar sinh
shekhar sinh

या कामासाठी विविध विभागांची मदत घ्या. तसेच संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाने तात्काळ कोरोना चाचणी ही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत केल्या. या बैठकीमध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयु बेड, ऑक्सिन उपलब्धतेबाबत व औषधसाठांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

दरम्यान गृह विलगीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे गृह विलगीकरण बंद करण्यात आले असून कोरोना रुग्णांसाठी गावपातळीवर विलगीकरण कक्ष करण्यात यावे तसेच ग्रामदक्षता समितीने गावातील रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात आणावे, अशी सूचना नुकतीच जिल्हाधिकारी सिंह यांनी केल्या हाेत्या. त्याची अंमलबाजवणी हाेते की नाही हे पाहण्यासाठी ते विविध तालुक्यांत दाैरे देखील करीत आहेत.

Teacher
'जे जगात घडले नाही; ते भारतात घडले आहे'

सातारा जिल्ह्यात बुधवारी विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 5107 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आज (गुरुवार) जिल्ह्यात 1531 रुग्णांची वाढ झाल्याचे डाॅ. चव्हाण यांनी नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com