बीइजीच्या जवानाला जिल्हावासियांचा सलाम; वर्णेकरांना अश्रू अनावर!

सूर्यकांत पवार
Sunday, 10 January 2021

सचिन काळंगे हे सैन्य दलाच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये 2000 रोजी भरती झाले होते. तेव्हापासून त्यांनी सलग 21 वर्षे जम्मू-काश्‍मीर, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, इलाहाबाद, अरुणाचल प्रदेश, सागर (गुजरात), तसेच तीन वर्ष राष्ट्रीय रायफलमध्ये हवालदार या पदावर सेवा केली.

अंगापूर (जि. सातारा) : खडकी (पुणे) येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मुख्य कार्यालयात कर्तव्य बजावताना काल हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने मृत्यू झालेल्या वर्णे (ता. सातारा) येथील जवान हवालदार सचिन विष्णू काळंगे (वय 40) यांच्या पार्थिवावर वर्णे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी लष्कर, प्रशासन, पोलिस, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

यामध्ये आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, उपजिल्हाधिकारी सोपान टोणपे, बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, मंडलाधिकारी सोमनाथ झनकर, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष धनंजय शेडगे, तलाठी कोळी व ग्रामसेवक सत्यवान वाघमारे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 

जिल्ह्यात 800 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची मोहीम

सचिन काळंगे हे सैन्य दलाच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये 2000 रोजी भरती झाले होते. तेव्हापासून त्यांनी सलग 21 वर्षे जम्मू-काश्‍मीर, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, इलाहाबाद, अरुणाचल प्रदेश, सागर (गुजरात), तसेच तीन वर्ष राष्ट्रीय रायफलमध्ये हवालदार या पदावर सेवा केली. त्यांच्या मागे माजी सैनिक असलेले वडील, बंधू संदीप, पत्नी अश्विनी, बारा वर्षांचा मुलगा प्रेम, दहा वर्षांची कन्या सिद्धी असा परिवार आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Marathi News Soldier Sachin Kalanke Pass Away In Pune