घाटकोपरच्या दुकानातही बाॅम्बची मिळू शकली नाही माहिती; तपास सुरु

bomb
bombsystem
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) : तांबवेतील (tambave) कोयना नदीपात्रात (koyna river) सापडलेले जिवंत लष्करी हॅंड ग्रेनेड (hand grained bomb) हे लष्करात 1961 रोजी तयार झालेले होते. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी लष्कराशी संपर्क साधून ते कधी, कोणाला वाटप केले आहेत याची माहिती मागवली. लष्कराने (army) त्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे लेखी कळवले आहे, अशी माहिती तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली. त्यामुळे आता तपासाची शक्‍यता धुसर झाली आहे. (satara-marathi-news-tambave-koyna-river-bomb-karad)

तांबवेतील कोयना नदीच्या पुलाखाली मासेमाऱ्यांना तीन जीवंत लष्करी हॅंड ग्रेनेड सापडले होते. त्याचा पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथक तपास करत होते. हॅंड ग्रेनेड लष्करी फॅक्‍टरी बनावटीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा तपास करण्याचे आव्हान होते. तालुका पोलिसांनी लष्कराच्या दारूगोळा निर्मिती कारखान्याशी संपर्क साधून या ग्रेनेड संदर्भात विचारणा केली. त्यामध्ये हॅंड ग्रेनेड निर्मितीच्या बॅच नंबरनुसार ते 1961 रोजी तयार झाल्याची माहिती समोर आली होती.

bomb
यंदाही आल्याचे दर निचांकी पातळीवर; दुसऱ्या वर्षीही कोरोनाचं संकट

लष्कराकडून आता संबंधित ग्रेनेड कोणाला, कशासाठी वितरण केले आहेत याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले होते. त्याचबरोबर ज्या प्लॅस्टिकच्या पिशवीत हॅंड ग्रेनेड सापडली होती. त्या पिशवीवरील दुकानाच्या नावावरून एटीएस आणि पोलिसांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये जाऊन त्या कपड्याच्या दुकानाचा शोध घेतला. मात्र, ठोस माहिती मिळाली नाही. दरम्यान पोलिसांनी त्यासंदर्भातील माहिती लष्कराकडे मागितली होती. त्यावर लष्करातील अधिकाऱ्यांनी संबंधित हॅंड ग्रेनेड 1967-68 रोजी लष्कराच्या रेकॉर्डवरून कमी झाले आहेत. ते ज्यांना वापरायला दिले जातात ते हवालदार दर्जाचे जवान असतात. मात्र ते कोणाला आणि कधी दिले याची माहितीच नसल्याचे लेखी दिल्याचे पोलिस निरीक्षक भरणे यांनी सांगितले. दरम्यान लष्कराच्या या माहितीमुळे आता तपासाची शक्‍यता धुसर झाली आहे.

प्लॅस्टिक पिशवीचा मुंबईत तपास

कोयना नदीपात्रात प्लॅस्टिकच्या पिशवीत हॅंड ग्रेनेड सापडली होती. त्या पिशवीवरील दुकानाच्या नावावरून एटीएस आणि पोलिसांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये जाऊन त्या कपड्याच्या दुकानाचा शोध घेतला. दुकानदाराकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली; परंतु त्याच्याकडून ठोस माहिती मिळू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Protesting remarks on farmers and demanding a public apology.
Yellow Wagtail bird deaths in Maharashtra
Maharashtra Crop Loss Compensation News Farmers Await Five Thousand Rupees Advance Aid With 33 Percent Damage Eligibility Criteria
Harshada Deshmukh Wins in Satara NCP Workers Celebrate Victory With Gulal and Enthusiastic Slogans Across the City