esakal | साताऱ्यात लाॅकडाउनविरोधात व्यापारी आक्रमक; आंदोलनात राजेंच्या पत्नीचाही सहभाग!
sakal

बोलून बातमी शोधा

Trader

आज (मंगळवार) सातारा शहरात व्यापाऱ्यांनी मूक आंदोलन छेडत प्रशासनाच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवत न्याय देण्याची मागणी केली.

साताऱ्यात लाॅकडाउनविरोधात व्यापारी आक्रमक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सातारा : कोरोना बाधितांची (Corona Patient) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रशासनाने (District Administration) संपूर्ण जिल्हा पुन्हा लाॅकडाउन (Corona lockdown) केला आहे. जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश केल्याने अन्य व्यावसायिकांत नाराजी पसरली आहे. परिणामी, जिल्ह्यातील विविध तालुक्यांत लाॅकडाउन हटवा यासाठी व्यापाऱ्यांच्या बैठका होत आहेत. त्याच अनुषंगाने आज शहरात व्यापाऱ्यांनी (Trader) 'लॉकडाउन हटवा व्यापार्‍यांना वाचवा, न्याय द्या', अशा मागण्या करत शहरातील छोट्या दुकानदारांनी फलक व घोषणाबाजी करत लॉकडाउनच्या विरोधात भूमिका घेत शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नीही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. (Satara Marathi News Traders Agitation Against Lockdown In Satara)

आज (मंगळवार) सातारा शहरात व्यापाऱ्यांनी मूक आंदोलन छेडत प्रशासनाच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवत न्याय देण्याची मागणी केली. शहरातील विविध छोटे, मोठे व्यापारी आज पालिका, तहसीलदार कार्यालयाबाहेर जमले होते. त्यांनी शासनाच्या विरोधासह लॉकडाउनविरोधी घोषणाबाजी केली. त्यांच्या हातात फलक होते. त्यावर लॉकाडउन हटावो, व्यापार बचावो अशा विविध घोषणाही होत्या.

हेही वाचा: '..तर पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू'

Police

Police

सामान्य लोकांचा विचार न करता लॉकडाउन योग्य नाही. त्यामुळे लॉकडाउन रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा व्यापारी वर्गाने प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, आज 12 आमदारांच्या निलंबनावरुन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन होणार असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. या सर्व घडामोडीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सातारा पोलिस दल सज्ज झाले आहे.

Satara Marathi News Traders Agitation Against Lockdown In Satara

loading image