esakal | '..तर पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू'
sakal

बोलून बातमी शोधा

Sakshana Salgar

युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सलगर यांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने फोनवरून धमकी देत अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली आहे.

'..तर पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू'

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांना पडळकरांच्या बगलबच्चांनी फोन करून अत्याचार करण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा आम्ही निषेध करतो. अशा धमक्यांना राष्ट्रवादीच्या महिला, युवती घाबरणार नाहीत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाघिणी आहोत. अशा बगलबच्चांना घरात घुसून मारू, असा इशारा राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख (Secretary Smita Deshmukh) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. (Smita Deshmukh Criticizes MLA Gopichand Padalkar Activist Over Sakshana Salgar Case Satara Political News)

युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सलगर यांना आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्याने फोनवरून धमकी देत अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या भ्याड कृत्याचा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) युवती सेलच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. स्मिता देशमुख म्हणाल्या, ‘‘महिला सर्वच क्षेत्रात आणि राजकारणातही आघाडीवर आहेत. प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार पडळकरांचे बगलबच्चे आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाहीत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही.

हेही वाचा: वारीबाबत शासनाची कृती दुर्योधन, दुःशासनासारखीच

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आम्हाला लढण्याची ताकद दिली आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) महिला सुरक्षित आहेत.’’ गोपीचंद पडळकर पवार साहेबांविषयी केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यांच्या बगलबच्चांना मला सांगण्याचे आहे, की हे प्रकार थांबवा. महाराष्ट्रातील सर्व महिला, युवती पेटून उठल्या आहेत. महिलांबाबत अशी अत्याचाराची भाषा आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Smita Deshmukh Criticizes MLA Gopichand Padalkar Activist Over Sakshana Salgar Case Satara Political News

loading image