esakal | सातारा : 'रेमडेसिव्हर' 35 हजारांना विकताना वाॅर्डबाॅयला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

सातारा : 'रेमडेसिव्हर' 35 हजारांना विकताना वाॅर्डबाॅयला अटक

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमडेसिव्हर इंजेक्शन (remdesivir injection) पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉय (ward Boy) रेमडेसिव्हरचा काळाबाजार करीत असल्याचे समजताच अन्न व औषध प्रशासन (food & drug department) विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्डबॉयला रंगेहात पकडले. (satara marathi news ward boy arrested remdesivir injection phaltan)

हा वॉर्डबॉय रेमडेसिव्हरचे एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस विभागाने त्याचे नाव सध्या तरी घाेषीत केलेले नाही. पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: रेमडेसिव्हीर म्हणजे अमृत नाही - तात्याराव लहाने

यापुढे असा कोणी रेमिडिसवर औषधाचा काळाबाजार करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा