esakal | रेमडेसिव्हीर म्हणजे अमृत नाही - तात्याराव लहाने

बोलून बातमी शोधा

remdesivir
रेमडेसिव्हीर म्हणजे अमृत नाही - तात्याराव लहाने
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. या इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार राजकारणही सुरु आहे. कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिव्हीर प्रभावी ठरताना दिसत असल्याने या इंजेक्शनला मोठी मागणी आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हीर मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागतेय. रेमडेसिव्हीरचा वापर करण्यासंदर्भात काही गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. पण सध्या सर्रास या इंजेक्शनचा वापर सुरु असल्याने तुटवडयाची स्थिती निर्माण झालीय.

हेही वाचा: कोरोनावर प्रभावी 'विराफीन' बद्दल तात्याराव लहानेंनी दिली महत्त्वाची माहिती

या संदर्भात राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य तात्याराव लहाने यांनी रेमडेसिव्हीर म्हणजे अमृत नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. "रेमडेसिव्हीरच्या वापरासाठी काही गाईडलाइन्स दिल्या आहेत. त्या गाईडलाईन्सनुसार हे इंजेक्शन दोन ते नऊ दिवस दिले पाहिजे. पण सध्या पेशंटला ताप आला की, डॉक्टरच लगेच हे इंजेक्शन देतात. पेशंटही हे इंजेक्शन देण्याची मागणी करतात. रेमडेसिव्हीर व्हायरल लोड कमी करतो. पण म्हणून ते सरसकट देऊ नये. काळजीपूर्वक, गरज असेल तेव्हा हे इंजेक्शन द्यावे" असे तात्याराव लहाने म्हणाले.

हेही वाचा: रेमेडिसिवीर मिळालं नाही तर घाबरु नका; डॉक्टर सांगतात...

"रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना रेमडेसिव्हीरचा फायदा होत नाही. नऊ दिवसानंतर रेमडेसिव्हीर देऊन उपयोग नाही. प्रत्येक जण त्या रेमडेसिव्हीरच्या मागे धावत आहे. गरज आहे तिथे रेमडेसिव्हीर दिलं पाहिजे" असे तात्याराव लहाने म्हणाले.

"रेमडेसिव्हीरच्या खरेदीसाठी आंतरारष्ट्रीय बाजारात जाहीरात दिल्या आहेत. पेशंटना बरं करण्यात रेमडेसिव्हीरचा फायदा होतोय. सहाच्या पुढे ही इंजेक्शन्स देऊ नयेत, गाइडलाइन्स पाळल्या तर फायदा होईल" असे तात्याराव लहाने यांनी सांगितले.