
- गिरीश चव्हाण
सातारा : वाढलेले तापमान, पाण्याची कमतरता तसेच लागवडीखालील पिकांच्या क्षेत्रात घट होत चालल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक मंदावली आहे. आवक मंदावल्याचा परिणाम रविवारी किरकोळ बाजारात दरवाढ झाल्याचे जाणवले. रविवारी फ्लॉवर, मेथी, तांदळी, पोकळा यासह इतर पालेभाज्यांच्या दरात देखील वाढ झाली होती.