जावळीत कोविड सेंटर उभारण्यासाठी मुंबईत बैठक; उद्योजक, कार्यकर्त्यांची उपस्थिती

संदीप गाडवे 
Wednesday, 16 September 2020

जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून कोविड सेंटर उभारण्यासंदर्भात सर्व बाबींची माहिती घेऊन त्यासंदर्भात युध्दपातळीवर पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

केळघर (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बाधितांवर वेळेत उपचार करता यावेत, यासाठी मेढा व केळघरला ऑक्‍सिजनयुक्त कोविड सेंटर उभारण्यासंदर्भात चर्चा व विचारविनिमय करण्याकरिता मेढा व केळघर विभागातील मुंबईस्थित उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. 

कांदा निर्यातबंदीबाबत भाजप खासदार उदयनराजे आक्रमक!

मलबार हिल (मुंबई) येथील गगनगिरी महाराज ट्रस्टच्या अध्यात्मिक सभागृहात पुनवडीचे उद्योजक अशोक पार्टे यांचे विशेष प्रयत्न आणि गगनगिरी ट्रस्टचे विश्वस्त संजय शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली झाली ही बैठक झाली.

पाचगणीतील बेल एअर घेणार कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचा खर्च

बैठकीत जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून कोविड सेंटर उभारण्यासंदर्भात सर्व बाबींची माहिती घेऊन त्यासंदर्भात युध्दपातळीवर पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

शिवेंद्रसिंहराजेंनी स्ववास्तूत उभारले कोविड सेंटर 

याप्रसंगी बोडारवाडी धरण कृती समितीचे अध्यक्ष विजयराव मोकाशी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे, उद्योजक राजेंद्र धनावडे, कोल्हापूर जिल्हासंपर्क प्रमुख दिव्या बडवे, उद्योजक विजय सावले, वेण्णा निरंजना पतसंस्थेचे संचालक विनोद शिंगटे, भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे दीपक मोरे, संतोष पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते. 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Meeting In Mumbai To Set Up Covid Center In Jawali Entrepreneurs Activists present