सदस्य भडकले, सीईओ माण पंचायत समितीचे मालक नाहीत

सदस्य भडकले, सीईओ  माण पंचायत समितीचे मालक नाहीत
Updated on

दहिवडी (जि. सातारा)  : सीईओ पंचायत समितीचे मालक नाहीत, असे म्हणत माण पंचायत समितीच्या मासिक सभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्यावर आगपाखड करण्यात आली. येथील बचत भवनात आज समितीची मासिक सभा आयोजिली होती. या सभेस सभापती कविता जगदाळे, उपसभापती तानाजी कट्टे, गटविकास अधिकारी गोरख शेलार, पंचायत समिती सदस्य रमेश पाटोळे, नितीन राजगे, विजयकुमार मगर, रंजना जगदाळे, तानाजी काटकर, लतिका वीरकर, अपर्णा भोसले उपस्थित होते.
 
काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या विभागप्रमुखांची आढावा बैठक आयोजिली होती. या बैठकीस सभापती कविता जगदाळे व गटविकास अधिकारी गोरख शेलार, तसेच पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर उपस्थित होते. या बैठकीस उपसभापती व इतर सदस्य उपस्थित नव्हते. मात्र, या बैठकीस इतरांना निमंत्रण नव्हते. याच अनुषंगाने आजच्या बैठकीत विजयकुमार मगर यांनी विषय उपस्थित केला. ते म्हणाले, की पंचायत समितीत बैठक असूनही आम्हाला बैठकीची माहिती देण्यात आली नव्हती. आम्हाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्यात येत नाही. यावर गटविकास अधिकारी शेलार म्हणाले, की कोरोनामुळे सातारा येथे विभागप्रमुखांची एकत्रित बैठक घेण्याऐवजी प्रत्येक पंचायत समितीमध्ये घेण्यात आली होती. या बैठकीचा पदाधिकाऱ्यांशी संबंध नव्हता. सभापती कविता जगदाळे म्हणाल्या, की संपूर्ण बैठकीत मीही काही बोलले नाही. बैठक संपल्यानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

तुम्ही मुंबईवरुन कऱ्हाडला येताय? मग ही बातमी अवश्य वाचा 
 
यावर सर्व पंचायत समिती सदस्यांची आगपाखड झाली. रमेश पाटोळे म्हणाले, की सीईओ पंचायत समितीचे मालक नाहीत. तानाजी काटकर म्हणाले, की आम्हाला डावलण्यात आले, तर सीईओंना पंचायत समितीत येऊ दिले जाणार नाही. नितीन राजगे म्हणाले, की असला कारभार खपवून घेतला जाणार नाही. सदस्यांच्या आजच्या आक्रमक पवित्र्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

गंभीर रुग्णांना इथं आणताय... मग हे नक्की वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kisan Veer College wins badminton title for second straight year.
Ahir Tapola bridge Koyna Satara latest news
Hartalika Ganesh Chaturthi
Satara Traffic Diversion
Marathi News Esakal
www.esakal.com