सैनिकांनाे! दीपावलीनिमित्त मिलिटरी कॅंटीन सुरु राहणार

सिद्धार्थ लाटकर
Friday, 30 October 2020

कॅंटीनमध्ये येताना मास्क बंधनकारक आहे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळणे आवश्‍यक आहे, असे व्यवस्थापक कमांडर शिंदे यांनी कळविले आहे.

सातारा : येथील मिलिटरी कॅंटीन एक व दोन नोव्हेंबरला स्टॉक टेकिंगसाठी, तर 14 तारखेला लक्ष्मीपूजन आणि 15 व 16 नोव्हेंबरला भाऊबीजेनिमित्त बंद राहणार असल्याची माहिती कॅंटीनचे व्यवस्थापक कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली. माजी सैनिकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचारपर्यंत कॅंटीनला यावे. 

दीपावलीनिमित्त नऊ आणि दहा नोव्हेंबरला कॅंटीन पूर्ण दिवस सुरू राहणार आहे. इतर मंगळवारी पूर्ण व सोमवारी अर्ध्या दिवसाकरिता कॅंटीन बंद राहील. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विविध तालुक्‍यांतील कार्डधारकांनी दिलेल्या विशिष्ट तारखांना यावे.

गडकरी साहेब, महाराष्ट्रातील एनएचएआयच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना घरी पाठवा 

त्यानुसार चार ते नऊ नोव्हेंबरला सातारा, जावळी, कोरेगाव आणि कऱ्हाड, दहा ते 13 नोव्हेंबरला वाई, महाबळेश्‍वर, खंडाळा, पाटण आणि फलटण, 18 ते 23 नोव्हेंबरला माण, खटाव, वेळापूर, महाड, सातारा, कोरेगाव, 25 ते 28 नोव्हेंबर जावळी, वाई, खंडाळा, पाटण आणि फलटण, तर 29 व 30 नोव्हेंबरला वरील तारखांना येऊ न शकलेल्या कार्डधारकांनी यावे. कॅंटीनमध्ये येताना मास्क बंधनकारक आहे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळणे आवश्‍यक आहे, असे व्यवस्थापक कमांडर शिंदे यांनी कळविले आहे.

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींची पुण्यात फसवणूक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Military Canteen Schedule Of November Satara News