
सातारा : विधानसभेची निवडणूक होऊन आठ महिने झाले तरी अद्याप नवीन आमदारांना त्यांचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे आमदार फंडातून होणाऱ्या कामांना ब्रेक लागला आहे; पण आमदारांनी आपापल्या मतदारसंघात करायची कामे सुचवून त्याला प्रशासकीय मान्यता घेऊन ठेवली आहे. आता या पावसाळी अधिवेशनात निधीबाबत चर्चा होऊन तो उपलब्ध झाल्यावरच निविदा प्रक्रिया व निधी वितरण होणार आहे. सध्या सर्व आमदारांचे अधिवेशन काळात निधी मंजूर करून घेण्याकडे कल दिसत आहे.