आधुनिक यंत्रयुगाचा या व्यावसायिकांना फटका

man
man

कुकुडवाड (जि. सातारा) : ग्रामीण भागात वंशपरंपरागत चालत आलेले व्यवसाय आजही काही बांधव करत आहेत. त्यातीलच लाकडी नांगर, तिफन, कुळव आणि विविध शेती उपयोगी साधने बनवण्याचे काम वंशपरंपरागत सुतार बांधव करत आहेत. परंतु, आज पेरणी, पाळी घालणे अशी कामे शेतकरी ट्रॅक्‍टरच्या साह्याने करत आहेत. त्यामुळे सुतार बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. 

पूर्वी खेडेगावात असणारे बारा बलुतेदार हे आपापल्या व्यवसायात पारंगत होते. हे सर्व व्यवसाय शेतीशी निगडित असल्याने ते वस्तू-विनिमय पद्धतीने आपला उदरनिर्वाह करत असत. पुढे त्याचे रूपांतर रोख रकमेच्या स्वरूपात होऊ लागले. त्यामुळे गावोगावी लहान व्यावसायिक तयार झाले. आधुनिक यंत्राच्या युगात छोटे व्यासायिकांचे व्यवसाय बंद होऊ लागल्याने त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न गंभीर बनला. 

पूर्वी घराच्या बांधकामासाठी दारे, खिडक्‍या आणि चौकटी या लाकडापासून बनवल्या जात होत्या. परंतु, आज लोखंड आणि ऍल्युमिनियमचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यामुळे लाकडापासून या वस्तू बनवायचे सुतारांचे काम बंद झाले आहे. त्यातच ग्रामीण भागात बैलजोड्या कमी झाल्या असल्याने नांगर, बैलगाडीही लोखंडी औजारांची वापरात येत आहे. शेतीपूरक साहित्यात लाकडाऐवजी लोखंडाचा शिरकाव होत असल्याने सुतार कारागिरांची चांगलीच पंचायत होऊन बसली आहे.
 
काही मोठे व्यावसायिक पलंग, डायनिंग टेबल, खुर्ची आणि सोफा हे साहित्य लाकडापासून बनवतात. परंतु, लहान व्यावसायिक हे घराची आणि शेतीची औजारे बनवण्याचे काम करतात. कोरोनाच्या महामारीमध्ये लॉकडाउच्या काळात घरांचीही कामे बंद आहेत. परिणामी या व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आजच्या आधुनिक युगातही परंपरागत शेतीच्या साधनालाही महत्त्व आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com