खुशखबर! साताऱ्यात चार हजारांहून अधिक बेरोजगारांना नोकरीची संधी

खुशखबर! साताऱ्यात चार हजारांहून अधिक बेरोजगारांना नोकरीची संधी
Updated on: 

सातारा : कोरोनामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील कामगार निघून गेल्याने सध्या जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींत कामगारांची कमतरता भासत आहे. सध्या उपलब्ध कामगारांच्या जीवावर उद्योग चालवावे लागत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. 11 तालुक्‍यांतील विविध उद्योगांत चार हजार 93 अकुशल कामगारांच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसे न होता, सर्व विभाग एकमेकांकडे बोट दाखवून हे आमचे काम नाही, असे म्हणून अंग काढून घेतले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध असूनही त्यांना मार्गदर्शनच मिळत नसल्याचे चित्र आहे.
 
जिल्ह्यात सात औद्योगिक वसाहती आणि एक विशेष औद्योगिक क्षेत्र आहे. कोरोनामुळे उद्योग बंद राहिल्यामुळे सध्या सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे. आता लॉकडाउन शिथिल होऊ लागल्याने उद्योगांचे चक्रे फिरू लागली आहेत. बंद काळातील विविध कर, वीज, पाणीबिलेही उद्योगांना भरावी लागली आहेत. त्यामुळे उद्योजक अडचणीत आलेले आहेत. अशा परिस्थितीतही उद्योजकांनी उपलब्ध होतील, तेवढ्या कामगारांच्या माध्यमातून उद्योग पुन्हा सुरू केला आहे, तरीही काही उद्योगांना आजही कामगारांची समस्या भेडसावत आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांतून सुमारे एक लाखावर कामगार आपापल्या जिल्ह्यात निघून गेले आहेत, तर त्यापेक्षा जास्त लोक बाहेरच्या जिल्ह्यांत नोकरीनिमित्त होते. ते आता स्वगृही आले आहेत. त्यांच्या हाताला आता जिल्ह्यातच काम मिळू शकते. सध्या जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांतील विविध उद्योगांत सुमारे चार हजार 93 अकुशल कामगारांच्या जागा रिक्त आहेत. यामध्ये सातारा 660, कऱ्हाड 730, जावळी 11, वाई 516, खंडाळा 1500, कोरेगाव 60, माण 35, फलटण 90, खटाव 22, महाबळेश्‍वर चार, पाटण 30 रिक्त जागांचा समावेश आहे.
 
सर्वाधिक नोकरीच्या संधी खंडाळा, सातारा, कऱ्हाड तालुक्‍यांतील उद्योगांत आहेत. यामध्ये काही उद्योग औद्योगिक वसाहत क्षेत्रात, तर काही उद्योग स्वतंत्र आहेत. त्यामुळे इतक्‍या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतील, तर औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र यांनी समन्वय साधून जिल्ह्यातील स्थानिकांना नोकरींच्या संधी उपलब्ध करण्याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. नोकरीची संधी उपलब्ध असलेल्या उद्योगांमध्ये काही उत्पादित कंपन्या, तर काही सेवा उद्योग आहेत. खंडाळा तालुक्‍यात विशेष औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनाही कामगारांची समस्या सर्वाधिक भेडसावत आहेत. त्यामुळे स्थानिका सुशिक्षित बेरोजगार युवकांना या रिक्त जागांची संधी उपलब्ध करून देण्याचे काम सेवा योजन अधिकारी, कामगार आयुक्त कार्यालय व औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना याबाबतचे मार्गदर्शन करून कंपन्यांशी संपर्क करून त्यांना योग्य क्षमतेचा कुशल व अकुशल कामगार उपलब्ध करून दिल्यास सर्वच उद्योगांचा कामगारांच्या समस्येतून मार्ग निघू शकणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी बेरोजगार युवकांप्रश्‍नी लक्ष घालावे 

स्थानिक बेरोजगार युवकांना आपल्याच जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध होणार, असे भाषणात लोकप्रतिनिधी सांगत आहेत; पण प्रत्यक्षात कोणीही पुढे येऊन जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या युवकांना कंपनीपर्यंत पोचविण्याचे काम करताना दिसत नाही. औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार आयुक्त कार्यालय, सेवा योजन अधिकारी हे सर्व विभाग एकमेकांवर ढकलत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनातून थोडा वेळ काढून बेरोजगार युवकांसाठी काहीतरी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

नाेकरीसाठी नोंदणी कशी करावी  पहा

शिवेंद्रसिंहराजेंचा दिलासा.... 

साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी व सातारा तालुक्‍यांतील बेरोजगार युवकांसाठी स्वतंत्र नोंदणी करून त्यांना औद्योगिक वसाहतीत मोफत नोकरी देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारांवर युवकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे ही एकमेव सकारात्मक बाब जिल्ह्यात झालेली आहे.

दहावीनंतर काय? विनामुल्य वेबिनारचे आयोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com