

Satara Pride: Mother and Son Achieve Mount Kilimanjaro Summit
Sakal
सातारा: सदरबझार येथील मनीषा प्रवीण भुजबळ यांनी त्यांचा मुलगा ऋग्वेद याच्यासमवेत नुकतेच किलिमांजारो शिखर सर करून नववर्षाचे स्वागत केले. मनीषा या ४० वर्षांच्या असून, ऋग्वेद हा १५ वर्षांचा आहे. ऑनररी कॅप्टन हणमंत धर्माजी भुजबळ (मराठा लाइट इन्फंट्री) यांच्या मनीषा या स्नूषा आहेत, तर ऋग्वेद हा नातू आहे. आई-मुलाच्या जिद्दीचे, धाडसाचे कौतुक होत आहे.