सातारा : तोडलेली वीज कनेक्शन न जोडल्यास आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : तोडलेली वीज कनेक्शन न जोडल्यास आंदोलन

सातारा : तोडलेली वीज कनेक्शन न जोडल्यास आंदोलन

सातारा (कऱ्हाड) ः दोन वर्षांपासुन सुरू असलेल्या कोरोना संकटाने हैरान झालेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची विज तोडून महावितरणने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे वाडी-वस्त्यांवर रहाणाऱ्या लोकांचा पिण्याचा पाणी पुरवठाही बंद होत आहे. महावितरणने ही कारवाई तातडीने थांबवुन तोडलेली कनेक्शन पुन्हा जोडावी. अन्यथा भाजपा किसान मोर्चाच्यावतीने २६ नोव्हेंबरला तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला.

भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, जिल्हा परीषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, पार्लेच्या सरपंच अश्विनी मदने, करवडीचे सरपंच प्रविण पाटील, विरवडेचे उपसरपंच सागर हाके आदींनी महावितरणचे कार्यकारी अभियंता रविंद्र बुंदेले यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे सुर्यकांत पडवळ, शंकरराव शेजवळ, प्रशांत भोसले, बिपिन जगदाळे, बाबुराव चौधरी,अक्षय चव्हाण, बाळासाहेब पोळ, व कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. वेताळ म्हणाले, महाविकास अघाडीचे सरकार हे वसुली सरकार आहे.

हेही वाचा: 'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

गेली दोन वर्षांपासुन सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच महापुर, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अद्याप सरकारकडुन मदत मिळालेली नाही. उलट कृषी पंपांची विज बिले थकली म्ह्णून महावितऱणे कृषी पंपांचा विज पुरवठा तोडण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांना तीन महिन्यापेक्षा जास्त दिवसांचे सरासरी बिले देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे महावितऱणे तातडीने ही कारवाई थांबवुन तोडलेली कृषी पंपाची वीज कनेक्शन पुन्हा जोडावी. अन्यथा भाजपा किसान मोर्चाच्यावतीने 26 नोहेंबरसा तिव्र आंदोलन करण्यात येईल.

loading image
go to top