शरद पवारांवरील टीकेस खासदार श्रीनिवास पाटलांनी धरले 'यांना' जबाबदार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

विरोधकांच्या टीका, टिप्पणी करण्याच्या अधिकाराचा व यशवंत विचारांचा महाराष्ट्राने नेहमीच सन्मान केला आहे; पण असभ्य व असंस्कृत भाषा वापरून त्याला कलंक लावू नका, असेही खासदार पाटील यांनी म्हटले आहे.

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आमदार झालेल्या गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका निंदनीय आहे. दोन ते तीन पक्ष व त्यांच्या विचारधारा बदलून भाजपमध्ये प्रवेश केलेले व त्याची बक्षीस म्हणून मागच्या दाराने आमदारकी मिळवणाऱ्यांनी शरद पवारांवर हिन दर्जाची टीका केली असून, त्या व्यक्तीचा तर निषेध आहेच; परंतु अशा लोकांना संधी देऊन विधिमंडळासारख्या पवित्र वास्तूमध्ये आणणारेदेखील तितकेच जबाबदार आहेत, अशी टीका खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली.
 
महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर झाली आहे. त्यांचे वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनीदेखील तीच शिकवण आयुष्यभर जोपासली. त्यांच्यावर पडळकर हे हिन व विकृत दर्जाची टीका करतात ते अतिशय निंदणीय आहे. ते संतापजनकही आहे. विकृत विधान करणाऱ्या व्यक्तीने केवळ दोन- तीन वर्षांच्या आतच स्वार्थापोटी समर्थकांना वाऱ्यावर सोडले. आराध्य देवतेच्या खोट्या शपथा वाहिल्या. दोन ते तीन पक्ष व त्यांच्या विचारधारा बदलून त्याची बक्षीस म्हणून मागच्या दाराने आमदारकी मिळविली.
 
अशा व्यक्तीचा तर निषेध करत आहोतच; पण त्यांना संधी देऊन विधिमंडळासारख्या पवित्र वास्तूमध्ये आणणारेदेखील त्याच कृतीला तितकेच जबाबदार आहेत. विरोधकांच्या टीका, टिप्पणी करण्याच्या अधिकाराचा व यशवंत विचारांचा महाराष्ट्राने नेहमीच सन्मान केला आहे; पण असभ्य व असंस्कृत भाषा वापरून त्याला कलंक लावू नका, असेही खासदार पाटील यांनी म्हटले आहे.

महाबळेश्‍वर : शेतकरी, व्यापारी, लघू व मोठ्या कारखानदारांसाठी महत्वाची बातमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara MP Shriniwas Patil Criticies MLC Gopichand Padalkar