Video : उदयनराजे शिवेंद्रसिंहराजे भेटले अन् माध्यमांनी उदयनराजेंना छेडले; काय म्हणाले उदयनराजे वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

गोपीचंद पडळकरांच्या शरद पवारांवरील टिकेबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, ज्यांनी ज्यांच्यावर टिका केली त्यांनाच विचारा. मी माझे मत परखडपणे मांडतो. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जे कोण बोलणार असतील त्यांचे ते बघून घेतील, अशीही टिपणी त्यांनी केली.
 

सातारा : काेराेना आणि लाॅकडाऊनच्या तीन महिन्यांच्या कालावधीनंतर खासदार उदयनराजे भोसले हे सामाजिक अंतराचे नियम पाळत समाजात मिसळू लागले आहेत. काही कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावत आहेत. आज (मंगळवार) उदयनराजेंनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत जाऊन बॅंकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यांच्याभेटीचा तपशिल समजावा यासाठी बॅंकेच्या बाहेर उदयनराजेंना पत्रकारांनी गाठले. काेराेनाचा बाऊ झालेला पण जनतेने घाबरु नये, काळजी घेत आपली कामे करावीत असा सल्ला उदयनराजेंनी दिला.
मराठा जात प्रमाणपत्र असे काढा

तुम्ही पंढरीला जाणार आहात का या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले उद्याच्या आषाढी एकादशीला मी पांडूरंगाला साकडे घालण्यासाठी जाणार होतो. पण तेथे सर्वकाही बंद केले आहे. तेथे पहाटे दोनच्या सुमारास शासकीय पुजा होणार आहे.  पांडुरंगाच्या चरणी कोणते साकडे घालणार यावर उदयनराजे म्हणाले, राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांचा विचार केला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीतून मार्ग निघण्यासाठी राज्यस्तरावर ठोस निर्णय झाला पाहिजे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांनी देशाला दिशा दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने एक पाऊल पुढे टाकून काम केले पाहिजे. 

कोरोना विषयी उदयनराजे म्हणाले, कोरोनाचा बाऊ करण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलिया का न्यूझीलंडमधील शास्त्रज्ञांनी सांगितले की, चिकनमधून आणखी एक व्हायरस येणार आहे. म्हणून लोकांनी घाबरण्यापेक्षा वस्तूस्थितीला सामोरे जावे. बंदमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्या चोऱ्यामाऱ्या वाढतील. लोक आत्ता काम करायला इच्छुक आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी व काम करावे. कोरोनावर खात्रीशीर इलाज निघेल असे सांगता येत नाही. पुणे येथील सायरस सिरम इन्स्टिट्युटमध्ये लस निर्माण करण्यासाठी ऑक्‍सफर्डच्या मदतीने संशोधन सुरू आहे. जेवढे मृत्यू विविध आजार, सिमेचे संरक्षण आणि वृद्धावस्थेमुळे झालेत, त्यापेक्षा दसपटीने रस्ते अपघातात मृत्यू झाले आहेत. त्यामुळे निश्‍चिंत रहा. विविध राज्यात परतलेले कामगार पुन्हा येत आहेत. यापुढे प्रत्येकाला आपली प्रतिकार क्षमता वाढवावी लागणार आहे. 

अहाे काेराेना आतापर्यंत अनेकांना होऊनही गेला असेल. कोरोनासारखे तीन अब्ज व्हायरस जगात आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरण्यापेक्षा वस्तूस्थितीला सामोरे जावे. हा कोरोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकणार नाही. आज ना उद्या प्रत्येकाला जायचे आहे, त्यामुळे घाबरू नका, असा सल्लाही उदयनराजेंनी दिला आहे. 

गोपीचंद पडळकरांच्या शरद पवारांवरील टिकेबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, ज्यांनी ज्यांच्यावर टिका केली त्यांनाच विचारा. मी माझे मत परखडपणे मांडतो. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जे कोण बोलणार असतील त्यांचे ते बघून घेतील, अशीही टिपणी त्यांनी केली.

शिवेंद्रसिंहराजेंच्या भेटीबाबतचा तपशील मात्र उदयनराजेंनी गुलदस्त्यातच ठेवत अन्य प्रश्नांवर धडाड उत्तरे दिली.   

पाेलिसांच वागणं बरं नव्हं, शिवेंद्रसिंहराजेंची गृहमंत्र्यांकडे तक्रार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara MP Udayanraje Bhosale Statement On Covid 19 Pandemic Situation