Video : असा आहे ग्रेड सेपरेटरच्या उद्‌घाटनाचा उदयनराजेंचा प्लॅन

Video : असा आहे ग्रेड सेपरेटरच्या उद्‌घाटनाचा उदयनराजेंचा प्लॅन

सातारा : अनेक वर्षे साताऱ्यातील विकासकामांच्या केवळ घोषणा झाल्या. पण, सातारा विकास आघाडीची सत्ता पालिकेत आली आणि आम्ही दिलेल्या जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता केली आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामाला सुरवातीला अनेकांनी येथे पाणी साचणार, स्विमिंग पूल होणार, डबके तयार होणार अशी टीका केली. पण, आतातर अनेक लोक या कामाची पाहणी करून गेले. आमची कोणासोबत स्पर्धा नाही, असा टोला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांना लगावला.

अंतिम टप्प्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सातारा पालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, सुजाता राजेमहाडिक, राजू भोसले, दत्तात्रेय बनकर, सुनील काटकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, टी ऍण्ड टी कंपनीचे व्यवस्थापक अमोल देशमुख, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
ग्रेड सेपरेटरची संपूर्ण पाहणी केल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, पोवई नाक्‍यावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, अशी साताऱ्यात येणाऱ्या प्रत्येकाची मागणी होती. पोवई नाका परिसरात आठ रस्त्यांचा संगम होतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ घोषणा झाल्या. मात्र, सातारा विकास आघाडी पालिकेत सत्तेत आली. त्यावेळी आम्ही दिलेल्या वचनांची पूर्तता केली आहे. त्याचे श्रेय केवळ आम्हालाच नव्हे तर समस्त सातारच्या जनतेला व अधिकाऱ्यांना जाते. या कामाला मुर्त स्वरूप दिले ते टी ऍण्ड टी कंपनीला श्रेय जाते. या कंपनीचे प्रमुख अधिकारी शिवराम थोरवे यांचे कौतुक करावे वाटते. तेही सातारा जिल्ह्यातीलच असून सुरवातीपासून उत्साहाने त्यांनी या कामात सहभाग घेतला. ज्या भूमीत जन्माला आलो, त्या भूमीत चांगला प्रकल्प करायची त्यांची इच्छा होती. यानिमित्ताने ती पूर्ण झाली आहे. आता सातारकरांना उत्सुकता आहे की, कधीपासून ग्रेड सेपरेटर सुरू होणार. पण, संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत कामाचे उद्‌घाटन होणार नाही. नोव्हेंबरअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. सुरवातीला साठ कोटींचे काम होते. यामध्ये आम्ही 18 कोटींचा जादा निधी मंजूर करून आणला आहे.

साताऱ्यातील तीन हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल 
 
कुठल्याही प्रकल्पाचे काम करताना वेळ लागतो. नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. कासची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामात सुरवातीला अडचणी आल्या. पण, यातून कायमस्वरूपी तोडगा निघाला. अनेक वर्षांपासून साताऱ्यातील विकासकामांबाबतच्या केवळ घोषणा होत राहिल्या. पण, मला लोकांनी विश्‍वास ठेवल्याचा अभिमान वाटतो. सत्ता आज आहे, उद्या नाही, त्याला फारसे महत्त्व नसते. काम करण्यासाठी त्याचा उपयोग होतोय, हे महत्त्वाचे आहे. सातारा विकास आघाडीने दिलेल्या वचनांची पूर्तता झाली असून भविष्यात जे कोण पालिकेत येतील, त्यांच्याकडे देखभाल दुरुस्तीचे काम राहिले आहे. आमच्या जाहीरनाम्याचे 15 वर्षांपासून जाहीर ऑडिट करत आलो आहोत. सातारा विकास आघाडी नेहमी केलेल्या कामाची माहिती लोकांसमोर मांडते. आम्ही केलेली कामे आणि खर्च झालेला निधी याचा फ्लेक्‍स लावतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
बैठकीतच उदयनराजे म्हणाले ज्या ठिकाणी अडचण आहे, तेथे मला सांगा

छत्रपतींचा भव्यदिव्य पुतळा उभारणार... 

पोवई नाक्‍यावर भव्यदिव्य ग्रेड सेपरेटरचे काम झाले आहे, आता तेवढ्याच तोलामोलाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे, असे सांगून उदयनराजे म्हणाले, त्यासाठी निधीही उपलब्ध आहे. सध्या असलेला पुतळाही देखणा आहे. पण, ग्रेड सेपरेटरच्या प्रकल्पाच्या तुलनेत छोटा वाटतो. त्यामुळे तेथे भव्यदिव्य पुतळा उभारला जाणार आहे. लवकरच तेही काम पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

...तर तुमच्या आधी माझीच धरणात उडी : नरेंद्र पाटील

कतारमध्‍ये अडकलेले 32 भारतीय अखेर परतले मायदेशी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com