मुंबईतील पोलिस कर्मचारी दुचाकीवरुन मूळगावी आले; 15 दिवसानंतर झाले काेराेना बाधित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

संपूर्ण गाव परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तर त्यांच्या संपर्कातील "हाय रिस्क' संपर्कातील पत्नी, दोन मुले व एका मित्रास मायणीतील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर "लो रिस्क' कॉन्टक्‍टमधील नऊ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
 

कलेढोण (जि.सातारा) : मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेला कर्मचारी (वय 56) दुचाकीवरून पाचवड (ता. खटाव) येथे मूळ गावी आल्यावर त्यांना हायस्कूलमध्ये क्वारंटाइन केले होते. तेथे त्यांच्या रक्तातील साखर वाढू लागल्याने तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने पाचवडकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, 14 दिवस गावबंदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यांच्या संपर्कातील तिघांना मायणीतील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
याबाबत मायणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील तुरुकमाने यांच्या माहितीनुसार, पाचवड (ता.खटाव) येथील पोलिस कर्मचारी हा मुंबईहून ता.15 मे रोजी दुचाकीवरून गावात आला होता. त्यांना जयभवानी हायस्कूलमध्ये क्वारंटाइन केले होते. त्यानंतर त्यांना त्रास झाल्याने ते स्वतःहून ता.27 तारखेस घरी परतून रात्रभर मुक्काम केला. तर ता.28 मे रोजी पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांनी गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तपासणी केल्यानंतर त्यांच्या रक्तातील साखर वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर तो खासगी वाहनाने मायणीतील मेडिकल कॉलेजवर तपासणी व मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नोंदणी करून जिल्हा शासकीय रुग्णालयात घशातील स्त्राव देण्यासाठी दाखल झाला. काल ता.30 रोजी त्यांचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण गाव परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तर त्यांच्या संपर्कातील "हाय रिस्क' संपर्कातील पत्नी, दोन मुले व एका मित्रास मायणीतील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर "लो रिस्क' कॉन्टक्‍टमधील नऊ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
 
घटनास्थळी तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यूनुस शेख, पोलिस उपनिरीक्षक बाबूराव महामुनी, मायणीचे पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.

त्यांनी ठेवले व्हॉटस्‌ऍप स्टेटस, वादांमुळे 56 जणांवर गुन्हा दाखल; 32 जणांना अटक

आम्ही रेशनिंगचे वाटप करणार नाही 

कांद्याने आणले डोळ्यात पाणी, सरकारने कांदा खरेदी करण्याची मागणी

...तरीही सातारी कंदी पेढ्याची चवच न्यारी
 
चला तंबाखू करु या कायमची लॉकडाऊन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mumbai Police Constable Tested Covid 19 Positive