साताऱ्याचा 307 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; महसुली अनुदानातून मिळणार 34 कोटी 43 लाख

साताऱ्याचा 307 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; महसुली अनुदानातून मिळणार 34 कोटी 43 लाख
Updated on: 

सातारा : कोणतीही करवाढ नसलेला सातारा पालिकेचा 307 कोटी 47 लाखांचा अर्थसंकल्प सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात महसुली अनुदानातून या आर्थिक वर्षात पालिकेस 34 कोटी 43 लाख रुपये मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला असून, त्याबाबतच्या तरतुदी आणि योजनांची माहिती उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी सादरीकरणादरम्यान अर्थसंकल्पीय सभेस उपस्थित असणाऱ्या नगरसेवकांना दिल्या.
 
पालिकेची अर्थसंकल्पीय सभा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने आयोजिली होती. सभा सुरू झाल्यानंतर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सदस्यांसमोर पालिकेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. हा लेखाजोखा मांडतानाच त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा आपल्या कार्यकारिणीचा शेवटचा असल्याने तो मंजूर करण्याची विनंती सर्वांना केली. यानंतर लेखाधिकारी आरती नांगरे यांनी अर्थसंकल्पातील काही गोषवाऱ्याचे, तसेच आलेल्या उपसूचनांचे वाचन केले. हे वाचन संपल्यानंतर उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी अर्थसंकल्पाच्या सादरीकरणास सुरुवात केली.

शाहूपूरी, विलासपूरवासियांची सत्ताधा-यांकडून दिशाभूल : मोने, मोहितेंचे शरसंधान

विविध योजनांमधून मिळणाऱ्या निधीतून कोणकोणत्या कामासाठी, तसेच विभागासाठी या आर्थिक वर्षात किती आर्थिक तरतूद केली आहे, याची माहिती त्यांनी दिली. माहिती देत असतानाच येणाऱ्या सूचना आणि उपसूचनांची नोंद घेत त्याला उत्तरे देत अर्थसंकल्पीय सभेचे कामकाज सुरू ठेवले. मालमत्ता कर, पाणीकर, विशेष स्वच्छता कर, अग्निशमन कर, हद्दवाढीतील महसूल, इमारत भाडे, हातगाडा फी, नाट्यगृह भाडे, विकास कर, मंडई फी, महसुली, भांडवली अनुदाने यातून पालिकेस या वर्षात 307 कोटी 4 लाख 66 हजार 424 रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज शेंडे यांनी सभेत वर्तवत सभेचे कामकाज पूर्ण केले. दरम्यान, अर्थसंकल्पातील तरतुदींना विरोधी गटांनी हरकती घेतल्या आहेत. 

असा येणार रुपया 

  • पालिका कर, दर -12 पैसे
     
  • महसुली अनुदाने - 16 पैसे
     
  • भांडवली अनुदाने- 47 पैसे
     
  • मालमत्ता फी- 3 पैसे
     
  • व्याज, विलंब आकार- 2 पैसे
     
  • इतर उत्त्पन्न- 1 पैसे
     
  • ठेवी- 9 पैसे 
  • आस्थापन, प्रशासन खर्च- 18 पैसे
     
  • दुरुस्ती, देखभाल खर्च- 3 पैसे
     
  • आरोग्य सुविधा- 2 पैसे
     
  • पाणीपुरवठा- 2 पैसे
     
  • शिक्षण- 1 पैसे
     
  • विकासकामे- 68 पैसे
     
  • संकीर्ण खर्च - 1 पैसे
     
  • असाधारण खर्च - 5 पैसे


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khambatki Ghat traffic jam latest news
Farmers Demand ₹5,500 Per Tonne for Sugarcane
cotton cultivation in Phaltan taluka 2026
Raju Shetti warning to sugar factories
Marathi News Esakal
www.esakal.com