सातारा पालिका : "साविआ'त हालचाली,"नविआ' शांत; भाजपात संधी

सातारा पालिका : "साविआ'त हालचाली,"नविआ' शांत; भाजपात संधी
Updated on: 

सातारा : सातारा पालिकेच्या हद्दीत नव्याने सहभागी झालेल्या भागाला पालिकेच्या सभागृहात प्रतिनिधित्व देण्याच्या हालचाली सातारा विकास आघाडीत गतिमान झाल्याचे दिसून येत आहे. "साविआ'तील हालचाली गतिमान असल्या तरी नगरविकास आघाडीच्या गोटात स्वीकृत नगरसेवक निवडीच्या विषयावर शांतता आहे. साविआ आणि भाजप नव्याने स्वीकृत नगरसेवक निवडणार असली तरी नविआ मात्र, सभागृहातील स्वीकृत नगरसेवकाचा चेहरा आहे तोच ठेवण्याच्या मानसिकतेत आहे. 

साताऱ्यातील राजकीय समतोल राखण्यासाठी सातारा विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवकपदी दरवेळी नवीन चेहऱ्यास संधी देण्यात येते. राजकीय समतोल राखताना अनुभवी सदस्याचा निकष देखील स्वीकृतसाठी लावण्यात येतो. याच निकषानुसार निवडणुकीत पराभूत होऊनही ऍड. दत्ता बनकर यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली. सत्ता स्थापनेपासून बनकर हे साविआची खिंड सभागृहात लढवत आहेत. त्यांच्या जोडीला एक एक वर्ष कालावधीसाठी अनेकांना संधी देण्यात आली. सध्या ऍड. बनकर यांच्याजोडीला प्रशांत आहेरराव हे स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. आहेरराव यांच्या पाठोपाठ भाजपने विकास गोसावी यांना संधी दिली. मुदत संपल्याने गोसावी यांनी राजीनामा दिला आणि पालिकेत स्वीकृत नगरसेवक नव्याने नियुक्‍त करण्याच्या हालचालींना गती आली.

घर खरेदीदारांत कहीं खुशी, कहीं गम; दरवाढीचा सर्वसामान्यांना धक्का!

साविआच्या वाट्याला सदस्य संख्येनुसार दोन स्वीकृत नगरसेवक येत असले तरी यावेळी होणाऱ्या बदलांत ऍड. बनकर यांचे स्थान कायम राहण्याची शक्‍यता आहे. उर्वरित एका जागेवर संधी मिळावी, यासाठी साविआकडून अनेक इच्छुक आहेत. यामध्ये नव्याने पालिकेच्या हद्दीत सहभागी झालेल्या शाहूपुरीतून संजय पाटील, बाळासाहेब गोसावी, शाहूनगरसह त्रिशंकू भागातून संग्राम बर्गे यांच्याबरोबरच अरुण राजेभोसले, अनिल निकम, सचिन जगताप, प्रकाश राजेभोसले यांच्या नावांची चर्चा आहे. बनकर यांना कायम ठेवणार का, त्यांचा राजीनामा घेण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बनकर यांना कायम ठेवल्यास उर्वरित एका जागेवर खासदार उदयनराजे कोणाला नियुक्‍त करणार, याचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे.

...तर तुमचे दुकान बंद केले जाईल : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा नवा आदेश

साविआ पालिकेतील स्वीकृत नगरसेवकाचा चेहरा बदलण्याच्या तयारीत असली तरी त्या अनुषंगाने नविआत पूर्णपणे शांतता आहे. सभागृहात नविआची बाजू सक्षमपणे सांभाळण्याचे काम स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातून अविनाश कदम हे करीत आहेत. कदम उत्कृष्ट काम करत असल्याने त्यांना न बदलण्याच्या मानसिकतेत नविआ असल्याचे दिसून येत आहे. नविआ स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत सायलेंट मोडवर असून, भाजपसुध्दा वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत आहे. 

भाजपच्या गोटात वरिष्ठ पातळीवरून आदेशाची प्रतीक्षा 

साविआबरोबरच भाजपकडूनसुध्दा स्वीकृत नगरसेवकपदी नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. या निवडीदरम्यान भाजपकडून कोणाला संधी द्यायची, याची चाचपणी सुरू असली तरी वरिष्ठ पातळीवरून आदेश येईपर्यंत कोणताही निर्णय जाहीर न करण्याच्या मानसिकतेत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आहेत. पालिकेत कामकाजादरम्यान साविआने भाजपची कोंडी केली आहे. या राजकीय संघर्षात पालिकेत भाजपच्या मूळ गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखले आहे. हेच अस्तित्व कायम ठेवण्यासाठी भाजप साविआशी जुळवून घेणार नसल्याचे मत स्थानिक पदाधिकारी व्यक्‍त करत आहेत. 

कोयना धरणाचे जगभरातील शास्त्रज्ञांना आव्हान! 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
why Tapoḷa Ahir bridge is closed for traffic
Satara 17-year-old girl death case
Marathi News Esakal
www.esakal.com