सातारा पालिका निवडणुक लढण्यासंदर्भात शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

प्रवीण जाधव
Thursday, 21 January 2021

सातारकरांनी महाविकास आघाडीच्या मागे खंबीर उभे राहावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी या वेळी केले. 

सातारा : जावळी तालुक्‍यात 17 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांची सत्ता आल्याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषद आयाेजित केली हाेती. त्यावेळी त्यांनी सातारा पालिका निवडणुकीचे रणशिंग लवकरच महाविकास आघाडीच्या माध्यमातून फुकंले जाणार असल्याचे स्पष्ट केले. 

श्री. पवार म्हणाले, "" आगामी काळात आमचे लक्ष सातारा पालिका निवडणुकीकडे आहे. त्याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील व समविचारी पक्षांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. ताकदीने निवडणुकीत उतरण्यास त्यांची संमती आहे. त्या दृष्टीने आम्ही पालिका क्षेत्रात बैठका सुरू केल्या आहेत. 

काही नगरसेवक, कार्यकर्तेही आमच्या संपर्कात येत आहेत. भाजपचेही लोक नाराज आहेत; परंतु सर्व पक्षांसोबत घेऊन आम्ही निर्णय घेणार आहे. साताऱ्याचा पाहिजे असा विकास अद्याप झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या सत्तेचा लाभ साताऱ्याच्या विकासासाठी करून घेता यावा, यासाठी सातारकरांनी महाविकास आघाडीच्या मागे खंबीर उभे राहावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी या वेळी केले. 

कर्करोग, संसर्गजन्य रोगावर नॅनोकार्गो उपाय; भारतीय संशोधकाचा युरोपियन युनियन कमिशनकडून सन्मान ​

भाजपचे आमदारही आता खोटं बोलू लागलेत; राष्ट्रवादीच्या पवारांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला
 

जिल्ह्यातील टॉप टेन गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Muncipal Council Election Sharad Pawar Udayanraje Bhosale Shivendrasinghraje Bhosale Satara Political News