सेनेने जाहीर केली सातारा पालिका निवडणूकीची रणनीती

सिद्धार्थ लाटकर
Sunday, 21 February 2021

नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची एकत्रित बांधणी करून सर्व ताकदीनिशी पालिकेची निवडणूक लढविणार आहे.

सातारा : सातारा पालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी दिली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार लोकहिताचे घेत असलेले निर्णय आणि शासनाची प्रगती यावर विश्‍वास ठेऊन सातारा शहरातील अनेक जण शिवसेनेच्या प्रवाहात सामील होणार आहेत.

नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची एकत्रित बांधणी करून सर्व ताकदीनिशी पालिकेची निवडणूक लढविणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपर्कप्रमुख दिवाकर रावते, पश्‍चिम महाराष्ट्राचे समन्वयक दगडूदादा सपकाळ, नितीन बानुगडे-पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

खासदार उदयनराजे भाेसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांची पालिकेत वर्चस्व आहे. सातारा शहरातील पालिकेची सत्ता आपल्या ताब्यात असावी यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने यापु्र्वीच पॅनेल टाकण्याचे जाहीर केले आहे. आता शिवसेनेने देखील निवडणुक लढविण्याचे जाहीर केलेने आगामी काळात पक्षीय चूरस दिसेल असे चिन्ह निर्माण झाले आहे.

ज्या माणसाने स्वतःच्या दोन बॅंका विकल्या, पाच संस्था मोडीत काढल्या ते राष्ट्रवादीत नकोत

अथणी- रयत कारखान्याने एफआरपीपेक्षा दिला जादा दर; शेतकरी समाधानी

कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार द्या, अन्यथा रास्ता रोको

कोयनेला जागतिक पर्यटन केंद्र बनविणार; मुख्य अभियंता हणमंत गुणालेंची ग्वाही

पाकिस्तानात आज फडकणार भगवा; उदयनराजेही असणार उपस्थितीत

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Muncipal Council Election Shivsena Satara Marathi News