साताऱ्यात उद्यापासून 'या' गाेष्टींसाठी बंदी; काळजी घ्या,सतर्क रहा

साताऱ्यात उद्यापासून 'या' गाेष्टींसाठी बंदी; काळजी घ्या,सतर्क रहा

सातारा : सातारा शहर व त्रिशंकु भागातील नागरीकांना आता पुन्हा एकदा त्यांच्या घरानजीक भाजी व फळे मिळणार आहेत. कोरोना विषांणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा शहर व त्रिशंकु परिसरातील रस्त्यांवर भाजी आणि फळ विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली आहे.
अजित पवारांचे खटक्याव बाेट जाग्यावर पलटी
 
येथील प्रातांधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या दालनात आज (गुरुवार) तहसिलदार आशा होळकर, मुख्याधिकारी शंकर गोरे, सातारा शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, पोलिस निरीक्षक सातारा तालुका सजन हंकारे, सहायक पोलिस निरीक्षक शाहूपूरी विशाल वायकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चर्चा झाली. चर्चेअंती उद्यापासून (शुक्रवार, ता. 3 जूलै) पुढील आदेश होईपर्यंत सातारा शहर व त्रिशंकु परिसरातील मुख्य चौकात तसेच रस्त्यावर भाजी फळ व विक्री करिता बसणेस निर्बंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानूसार भाजी व फळ विक्रेत्यांनी पुर्वी प्रमाणे घरोघरी जाऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपण पालन करुन भाजी व फळे विक्रीचा व्यवसाय करावयाचा आहे असा आदेश काढला आहे. हा आदेश मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी काढला आहे. दरम्यान सातारकर नागरीकांनी त्यांच्या घराजवळ भाजीपाला आणि फळे खरेदी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत 'या' नियमांचे पालन करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह

जुलमी इंधन दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी; मेढ्यात कॉंग्रेसचे धरणे आंदाेलन
 

जिल्ह्यात विना पास कोणीही येऊ शकणार नाही : शंभूराज देसाई 

दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमारेषेवर कुणीही विना पास आत येवू नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत, तरीही नागरिक  पास नसतानाही जिल्ह्यात प्रवेश करत आहेत, यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणेनी कुणीही विना पास प्रवेश करणार नाही यासाठी पोलीस आणि महसूल यंत्रणेनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज (गुरुवार) कोरोना संदर्भात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रवेश होणाऱ्या प्रत्येक नाक्यावर सी.सी.टीव्ही कॅमेरे लावावेत,  अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पुढे म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे विनाकारण गाडीवरुन फिरणाऱ्यावर कारवाई करावी. पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर अधिक  कडक अंमलबजावणीसाठी करावा. कुणीही विना पास जिल्ह्यात प्रवेश करणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांनी शेवटी केल्या.

VIDEO : मुलाच्या विवाहाचा आनंद..अन् विधानसभा उपाध्यक्षांच्या नृत्याची झलक..एकदा बघाच!

प्रेमीयुगल होते बेपत्ता अन् शेतातच आढळले... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com