esakal | साताऱ्यात आजपासून पाणी कपात; तुमच्या भागात काेणत्या दिवशी पाणी येणार नाही वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यात आजपासून पाणी कपात; तुमच्या भागात काेणत्या दिवशी पाणी येणार नाही वाचा सविस्तर

ज्या भागात पाणी कपात करण्यात आली आहे. त्या परिसरातील नागरिकांनी पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा कदम, मुख्याधिकारी अभिजित बापट, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे. 

साताऱ्यात आजपासून पाणी कपात; तुमच्या भागात काेणत्या दिवशी पाणी येणार नाही वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : शहापूर योजनेच्या पाणी उपसा पंपामध्ये बिघाड झाल्यामुळे पुढील 12 दिवस शहरातील काही भागांमध्ये एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.
 
शहापूर योजनेच्या माध्यमातून उरमोडी नदीतून पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 200 एचपीच्या पंपामध्ये बिघाड झाला आहे. या पंपाच्या दुरुस्तीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या योजनेतून होणारा पाणी उपसा 50 टक्‍क्‍यांवर येणार आहे. त्यामुळे कास व शहापूर माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये आजपासून (शुक्रवार) 21 ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गावी जाणाऱ्या गणेशभक्तांनाे... तुमच्यासाठी टाेलमाफ, अट वाचा  

नियोजनानुसार वारनिहाय पाणी कपात करण्यात येणाऱ्या भागांची नावे पुढीलप्रमाणे, सोमवार - भैराबा टाकीवरून वितरित करण्यात येणारे शुक्रवार पेठ, गडकर आळी परिसर. राजवाडा टाकीवरून वितरित करण्यात येणारा तांदूळ आळी, मोती चौक ते देवी चौक ते लक्ष्मी हॉटेल, गोरक्षण बोळ, शनी मारुती मंदिर पिछाडी परिसर, मोती चौक ते 501 पाटील ते औंधकर मळा, मोती चौक ते राधिका टॉकीज ते अमृता नर्सिंग होमअखेर परिसर. पंपिंग लाइनवरून वितरित होणारा टोपे मामा दत्तमंदिर ते घोरपडे कॉलनी ते काकडे बोळ परिसर, तसेच जुना दवाखाना कोपरा लाईन.

व्वा, क्या बात है.. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात १४६७ गावं पितात शुध्द पाणी 

मंगळवार - व्यंकटपुरा टाकीवरून वितरित होणारा व्यंकटपुरा, धननीची बाग, करंडबी नाका परिसरत, तसेच सकाळ सत्रातील पोळ वस्ती, पॉवर हाऊस झोपडपट्टी परिसर व चिमणपुरा पेठ. घोरपडे टाकी (दुपार सत्र) कुंभारवाडा, कोल्हाटी वस्ती, चारभिंती टाकी ते कूपर कारखाना अखेर असणाऱ्या चार बैठ्या टाक्‍या घंटेवारी. 

बुधवार - कोटेश्‍वर टाकीवरून वितरित होणारा शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, नामदेववाडी परिसर. घोरपडे टाकीतून सकाळ सत्रात वितरण होणारा राजलक्ष्मी पिछाडी, शेटे चौक परिसर, नालबंद वाडा परिसर ते खड्डा मशीद, दत्तमंदिर ते कमानी हौद, राजसपुरा पेठ, दुर्गा पेठ. 

फोन अ फ्रेंड उपक्रमातून रयतच्या या शाळेतील शिक्षकांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा 

गुरुवार - कात्रेवाडा टाकीवरून वितरित करण्यात येणारा रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार तळे, कोल्हटकर आळी, नागाचा पार, मनामती चौक परिसर. गुरुवार टाकी पहिला झोन कूपर कारखाना ते पिसाळ आर्केड, शाहू गार्डन पिछाडी ते तरडे घर ते शिर्के हौद, पिसाळ आर्केड ओढ्यातील भाग, घोरपडे कॉलनी ते केसरकर पेठ, पार्टे घर, सूर्यवंशी वस्ती, जुना दवाखान्यातील काही भाग. गुरुवार टाकी दुसरा झोनमधील गुरुवार पेठ जमदाडे घर ते शिर्के शाळा, शिर्के शाळा ते कमानी हौद पिछाडी, शिर्के शाळा ते पटवर्धन गॅरेज, शनिवार पेठ कल्पक सहवास अपार्टमेंट परिसर ते वाघाची नळी परिसर ते न्यू इंग्लिश स्कूल कोपरा ते खणआळी व लंबे बोळ परिसर. गणेश टाकीवरून वितरित होणारा समर्थ मंदिर चौक ते हत्तीखाना, सोमवार पेठ परिसर, बागवान गल्ली, दैवज्ञ मंगल कार्यालय चौक ते न्यू इंग्लिश स्कूल कोपरा परिसर, जानकीबाई झंवर शाळा परिसर, खडकेश्‍वर शाळा परिसर. 

जाणून घ्या... डाॅ. नरेंद्र दाभाेलकरांच्या या पैलूंविषयी 

शुक्रवार - सकाळी सहा ते आठ कबीर सोसायटी व पोळवस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार, पद्यावती मंदिर परिसर, होलार समाजमंदिर परिसर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदिर परिसर, धस कॉलनी परिसर, दस्तगीर नगर परिसर. बुधवार नाका टाकीवरून वितरित होणारा बुधवार नाका ते बाबर कॉलनी, एकता कॉलनी, रघुनाथपुरा, शेंडे कॉलनी परिसर. 

रविवार - बोगदा परिसर, खापरी लाईन नंबरवरून वितरित होणारा बोगदा ते माची पेठ, अदालतवाडा परिसर, बालाजी अपार्टमेंट परिसर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा परिसर लाईन. यशवंत गार्ड पहिला झोनमधील भवानी शाळा, एलबीएस कॉलेज परिसर, रावखंडे बोळ परिसर, दुर्गा पेठ, रविवार पेठ सर्वोदय कॉलनी, लोणार गल्ली, कैकाड गल्ली, ते मरिआई कॉम्प्लेक्‍स, जगताप कॉलनी, पंताचा गोट परिसर, खंडोबा माळ, वडार वस्ती ते बडेकर वस्ती व कांबळे वस्ती, मल्हार पेठ परिसर. 

गुलाबी रंगाच्या पर्सची का हाेतेय चर्चा.. वाचा सविस्तर

याप्रमाणे त्या-त्या वाराला त्या-त्या परिसरात पाणी कपात होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा कदम, मुख्याधिकारी अभिजित बापट, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे. 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top