

500 Acres Await Transfer After Satara Civic Expansion, Infrastructure Projects Hit
esakal
-गिरीश चव्हाण
सातारा : हद्दवाढीनंतर सातारा पालिकेत आलेल्या शाहूपुरी, विलासपूर या दोन पूर्ण ग्रामपंचायती, तसेच शाहूनगर, पिरवाडीसह इतर उपनगरांतील खुल्या जागांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. यामुळे सुमारे शंभर हेक्टरहून अधिक जागांच्या कब्जेदार सदरी तत्कालीन ग्रामपंचायतींच्या नावाचीच नोंद आहे. या नोंदी हटून त्याठिकाणी पालिकेच्या नावाची नोंद झाली नसल्याने खुल्या जागांच्या विकसनाच्या कामावर पालिकास्तरावर मर्यादा येत आहेत.