

Leaders and officials discussing development issues at Satara Municipal Council.
sakal
-गिरीश चव्हाण
सातारा : निवडणुकीच्या निकालानंतर सातारा पालिकेत मोठ्या संख्येने नवख्या उमेदवारांचा शिरकाव झाला आहे. दोन्ही राजांच्या सुचनेनुसार नवख्यांना सोबतीला घेत त्यांना प्रशासकीय कामकाजाचे धडे देत जुन्यांना साताऱ्याच्या विकासाचा मेळ घालावा लागणार आहे. हा मेळ घातला, तरच दोन्ही राजांच्या नजरेतील विकासकामे मार्गी लागणार असून, त्यासाठीचा रोडमॅप नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना करावा लागणार आहे. हा रोडमॅप आणि जुन्या-नव्यांत ताळमेळ न बसल्यास सभागृहातील संघर्षाचे परिणाम विकासकामांवर होण्याची दाट शक्यता आहे.