सातारा : नवीन नळजोडण्‍या तात्‍पुरत्‍या बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

सातारा : नवीन नळजोडण्‍या तात्‍पुरत्‍या बंद

सातारा: उपलब्‍ध पाणीसाठ्याचा विचार करून येथील पालिकेने एक महिना नवीन नळजोडण्‍या न देण्‍याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने नवीन नळजोडण्‍यांसाठी सातारकरांना आता १५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सद्य:स्‍थितीत शहरात एक तास पाणी कपात असून ती आगामी काळातील पावसाचा अंदाज घेत कमी केली जाणार असल्‍याची माहिती पालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातून देण्‍यात आली.

सातारा शहराला प्रामुख्‍याने कास, शहापूर योजनेच्‍या माध्‍यमातून पाणीपुरवठा केला जातो. सध्‍या या दोन्‍ही योजनांची तांत्रिक क्षमता आणि उपलब्‍ध पाणीसाठ्याचा विचार करता शहरातील पाणीपुरवठ्यात एक तास कपात केली आहे. उन्‍हाची वाढणारी तीव्रता व उपलब्‍ध पाणीसाठ्याचा विचार करता पाणी कपात पालिकेने लागू केली. नवीन नळजोडणीसाठी शहरातील नागरिक पाणीपुरवठा विभागाकडे अर्ज करतात. त्यानुसार नागरिकांना नवीन जोडण्‍या दिल्या जात होत्या. मात्र, उन्‍हाळा असल्‍याने पालिकेने नव्याने नळजोडण्याचे काम बंद केले आहे.

कासमध्‍ये दहा फूट पाणी

सातारकरांसाठी जलदायी असणाऱ्या कास धरणाच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचे काम पालिकेच्‍या वतीने हाती घेतले आहे. ते अंतिम टप्‍प्‍यात आहे. या कामानंतर त्‍याठिकाणचा पाणीसाठा दुपटीने वाढणार आहे. सद्य:स्‍थितीत कासमध्‍ये दहा फूट पाणीसाठा आहे. वातावरणातील बदलामुळे उन्‍हाची तीव्रता कमी झाल्‍याने पाण्‍याच्‍या बाष्पीभवनाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे उपलब्‍ध पाणी नियोजित वेळापत्रकानुसार नागरिकांना पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे यांनी दिली.

Web Title: Satara Municipality New Pipelines Closure

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top