सातारा पालिकेत होणार ५० नगरसेवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

सातारा पालिकेत होणार ५० नगरसेवक

सातारा : लोकसंख्‍या वाढीचा विचार करतच नगरसेवकांची संख्‍या निश्‍चित होणार असल्‍याने सातारा नगरपालिकेच्‍या सभागृहातील नगरसेवकांची संख्‍या ५० च्‍या घरातच राहण्‍याची शक्‍यता आहे. मध्‍यंतरीच्‍या काळात शासनाने १५ टक्के वाढीचा निर्णय जाहीर केला होता, मात्र त्‍याबाबत कोणतेही स्‍पष्‍ट धोरण शासनाकडून जाहीर न झाल्‍याने प्रशासकीय यंत्रणांमध्‍ये संभ्रम आहे.

सातारा नगरपालिकेच्‍या सभागृहातील सध्‍याची नगरसेवकांची संख्‍या ४० आहे. हद्दवाढीनंतर शाहूपुरी, शाहूनगर, दरे खुर्द व इतर उपनगरे पालिकेच्‍या हद्दीत समाविष्ट झाली. पालिकेत नव्‍याने सामील झालेल्‍या भागातील लोकसंख्‍येचा विचार करता पालिकेच्‍या सभागृहात आणखी आठ नगरसेवक नव्‍याने वाढतील, अशी चर्चा साताऱ्यात सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच शासनाने एकूण सदस्‍यसंख्‍येचा विचार करत १५ टक्के वाढीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सातारा नगरपालिकेचे मूळ ४० नगरसेवकांत नव्‍याने वाढणारे आठ आणि नवीन निर्णयानुसार त्‍यात आणखी आठ नगरसेवकांची भर पडून एकूण संख्‍या ५६ च्या घरांत जात असल्‍याच्‍या चर्चेला वेग आला होता. दरम्‍यान, निवडणूक आयोगाच्‍या सूचनेनुसार सातारा पालिकेच्‍या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरू झाले. हद्दवाढीनंतर पालिकेत सामील झालेल्‍या नवीन भागासह मूळ सातारा शहरातील प्रभागांची पुनर्रचना होणार असल्‍याने साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. आरोप- प्रत्‍यारोप, विकासकामांच्या उद्‌घाटनांमुळे सर्वच सातारकरांना आगामी निवडणुकीतील रंगत कशी असेल, याचे दर्शन पदोपदी होऊ लागले. त्‍यातच राज्यपालांनी लोकसंख्‍या वाढीच्‍या निकषावर सदस्‍यसंख्‍या ठरविण्‍याचा आदेश दिल्‍याने नगरपालिका निवडणुकीच्‍या तयारीत गुंतलेल्‍या प्रशासकीय यंत्रणेत संभ्रम निर्माण झाला.

राज्‍यपालांच्‍या आदेशानुसार दहा वर्षांत १५ टक्के लोकसंख्‍या वाढ धरल्‍यास साताऱ्यातील नगरसेवक संख्‍या ५० च्‍या घरातच अडकून राहण्‍याची शक्‍यता आहे. पूर्वीच्या प्रचलित धोरणानुसार सातारा नगरपालिकेत एक लाख लोकसंख्‍येमागे ३८ नगरसेवक होते. नव्‍या धोरणानुसार त्‍यात दोनची भर पडल्‍याने एकूण सदस्‍य संख्‍या ४० च्‍या घरात पोचली असून, त्‍यावरील प्रत्‍येक प्रगणक क्षेत्रातील आठ हजार लोकसंख्‍येमागे एक नगरसेवक मान्‍य केल्‍यास पालिकेच्‍या सभागृहातील संख्‍या ४० वरून पन्नासच्‍या घरात जाणार आहे.

हेही वाचा: मुंबई: कांजूरमार्गमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

फक्‍त दोन नगरसेवकच वाढणार?

पूर्वीच्या धोरणानुसार नगरपालिकेच्‍या सभागृहात ४० नगरसेवक सक्रिय आहेत. हद्दवाढीनंतर त्‍या भागाला प्रतिनिधित्व देण्‍यासाठीच्‍या धोरणानुसार आणखी आठ नगरसेवक वाढणार आहेत. त्‍यातच नवीन धोरणाची अंमलबजावणी झाल्‍यास पालिकेच्‍या सभागृहात फक्‍त नव्‍याने दोनच नगरसेवक वाढण्‍याची चिन्‍हे आहेत.

loading image
go to top