

Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
sakal
काशीळ : शेंद्रे (ता. सातारा) येथे आज सायंकाळी जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या भांडणावेळी लोखंडी खोरे डोक्यात मारून सौरभ बाळू भिसे (वय २९, रा. शेंद्रे) यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी गावातीलच प्रमोद किसन जाधव, प्रताप किसन जाधव (मूळ रा. तारळे, ता. पाटण) यांना ताब्यात घेतले आहे.