

Bhonsle Stronghold Breached Independent Candidate Emerges Victorious
Esakal
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. बहुतांश ठिकाणचा कल स्पष्ट झाला आहे. भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतलीय तर महायुती राज्यात एकूण १८० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीला ४० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, काही ठिकाणी धक्कादायक निकाल हाती आले आहेत. साताऱ्यात दोन्ही राजेंना धक्का बसला आहे. तीन अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. असून एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.