मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, गृहमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलने झाली. साताऱ्यातही मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. त्यावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोठ्या प्रमाणात; पण शांततेत आंदोलन करण्यात आले होते, तरीही या आंदोलकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करण्यात आली.
अकरावी प्रवेशासाठी मराठा जात प्रमाणपत्र असे काढा

 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलने झाली. साताऱ्यातही मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. या आंदोलनात सर्वच स्तरांतील युवक व समाजबांधव सहभागी झाले होते; पण काही ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी निवेदनाद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. या वेळी गोरखनाथ नलावडे, अतुल शिंदे, शुभम साळुंखे, सनी शिर्के, समीर राजेघाटगे व पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवारांवरील टीकेस खासदार श्रीनिवास पाटलांनी धरले यांना जबाबदार 

शरद पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले हे आश्‍वासन

या प्रश्नावर अजित पवार म्‍हणाले, सातारकरांबद्दल आम्‍हाला अभिमानच...

प्रशासनाच्या कासव गतीने वाढविली 30 हजार युवकांची चिंता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Nationalist Congress Party Youth Demands Home Minister Anil Deshmukh To Take Cases Back Of Maratha Kranti Morcha