मलकापुरात पकडली 63 जणांची वीजचोरी; नऊ लाखांचा होणार दंड वसूल

राजेंद्र ननावरे
Saturday, 20 February 2021

महावितरणतर्फे 'एक दिवस वीज चोरी मुक्ततेचा' ही मोहीम मलकापुरात शाखा कार्यालयांतर्गत राबवण्यात आली.

मलकापूर (जि. सातारा) : महावितरणतर्फे 'एक दिवस वीज चोरी मुक्ततेचा' ही मोहीम येथील शाखा कार्यालयांतर्गत राबवण्यात आली. त्याअंतर्गत 63 धडक कारवाया करुन संबंधिताकडून नऊ लाखांचा दंड वसूल होणार असल्याची माहिती शाखा अभियंता युवराज धर्मे यांनी दिली.

महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे आणि मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या सूचनेनुसार 'एक दिवस वीज चोरी मुक्ततेचा' मोहिमेअंतर्गत अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड व कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. के. पाटील व उपकार्यकारी अभियंता ग्रामीण स्वप्नील जाधव यांच्या सूचनेनुसार मलकापूर शाखा कार्यालयांतर्गत मलकापूर, कापील, गोळेश्वर, जखिणवाडी व नांदलापुर गावांमध्ये हेमंत येडगे, अमोल साठे, वैभव राजमाने, शाखा अभियंता अभिजीत लोखंडे, श्वेता पाटील, प्रतिभा गायकवाड, श्री. फोरमन शिंदे, श्री. मुळे, अमर पवार, अभिमन्यू पिटके, आशिष भोंगाळे, दीपक मोहिते यांनी 569 ग्राहकांची तपासणी केली. त्यामध्ये 63 केसेस करण्यात आल्या. 

कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार द्या, अन्यथा रास्ता रोको

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News 63 People Steal Electricity In Malkapur