esakal | पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात मुंबईकडे जाणारा कंटेनर पलटी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कंटेनर ऍल्युमिनियमची भांडी बनविण्यासाठी लागणारी 24 टन पावडर घेऊन बंगळूरहून मुंबईला निघाला होता.

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात मुंबईकडे जाणारा कंटेनर पलटी

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : पुणे- सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर मुंबईकडे जाणारा कंटेनर (एमएच 46 बीबी 9010) आज दुपारी पलटी झाला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चालक बापूराव मधुकर जगदाळे (रा. पांढरवाडी, ता. सातारा) किरकोळ जखमी झाला.
 
पोलिसांनी सांगितले, की हा कंटेनर ऍल्युमिनियमची भांडी बनविण्यासाठी लागणारी 24 टन पावडर घेऊन बंगळूरहून मुंबईला निघाला होता. मात्र, बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या तीव्र उतारामुळे वाहनाचा वेग वाढल्याने कंटनेर चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला व कंटनेरचे हुक हेलकाव्याने तुटले. 

हे पण वाचा- भाजपच्या आमदाराची सभापती रामराजेंसोबत खलबत्ते; राष्ट्रवादीच्या गोटात चर्चांना उधाण

या अपघातात कंटेनर सिमेंट कठड्यावर जाऊन अडकला. या वेळी गाडीचे नुकसान झाले. पोलिसांनी वाहतूक थोडावेळ थांबवली. मात्र, या अपघातात जीवितहानी झाली नाही. या वेळी वाहूतक पोलिस विठ्ठल पवार व भुईंजचे पोलिस डेरे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत करून मदत कार्य केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे