esakal | भाजपच्या आमदाराची सभापती रामराजेंसोबत खलबत्ते; राष्ट्रवादीच्या गोटात चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi Political News

सध्या साताऱ्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतीमान होताना दिसत आहेत.

भाजपच्या आमदाराची सभापती रामराजेंसोबत खलबत्ते; राष्ट्रवादीच्या गोटात चर्चांना उधाण

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सध्या साताऱ्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतीमान होताना दिसत असून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात खलबते झाली. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिवरूपराजे खर्डेकर यांनी रामराजेंची भेट घेऊन चर्चा केली. तर माण, खटावमधून आमदार गोरेंच्या विरोधात व्यूह रचना करण्याबाबत स्थानिक नेत्यांशीही रामराजेंनी चर्चा केली. या चर्चेमुळे तर्कविर्तकांना उधाण आले असून जिल्हा बॅंकेची निवडणूक रंगतदार होण्याच्या मार्गावर असल्याचे या भेटीने स्पष्ट होत आहे. 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दररोज नवीन-नवीन घडामोडी घडू लागल्या आहेत. आजपर्यंत बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले केंद्रस्थानी होते. आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या भोवती राजकीय वातावरण फिरू लागले आहे. आज शासकीय विश्रामगृहात रामराजे थांबलेले असतानाच एका लग्नाचा सुपारीचा कार्यक्रम उरकून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले शासकीय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर उपस्थित होते. तर रामराजेंसोबत माजी आमदार प्रभाकर घार्गेही विश्रामगृहात उपस्थित होते.

फालतू बोलू नका, कसलं राजकारण.., म्हणून तरं खंडणीची केस पडली माझ्यावर; उदयनराजे भडकले

यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी रामराजेंशी अल्पवेळ चर्चा केल्यानंतर ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. या दोन्ही नेत्यांत जिल्हा बॅंकेच्या कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून या मतदारसंघातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे ही इच्छुक आहेत. या मतदारसंघावर शिवेंद्रसिंहराजे व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा डोळा आहे. तर शिवेंद्रसिंहराजेंकडे या मतदारसंघातील मते जास्त आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला मिळणार याचीच उत्सुकता आहे. यानंतर खटाव, माण तालुक्‍यातील प्रमुख नेत्यांनी रामराजेंची भेट घेतली. यामध्ये माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, बॅंकेचे संचालक अनिल देसाई तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळेंसह इतर नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी आमदार जयकुमार गोरेंना जिल्हा बॅंकेत येण्यापासून रोखण्यासाठी व्यूह रचना करण्याबाबत चर्चा झाली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image