पुण्याकडे निघालेल्या भरधाव ट्रकच्या धडकेत कऱ्हाडातील दांपत्य जागीच ठार

पुण्याकडे निघालेल्या भरधाव ट्रकच्या धडकेत कऱ्हाडातील दांपत्य जागीच ठार
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील कोल्हापूर नाक्यावर पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकीसह त्यावरील दांपत्याला ट्रकने जवळपास 200 फूट फरटत नेले. त्यामुळे दोघेही जागीच ठार झाले. ते दांपत्य काले (ता. कऱ्हाड) येथील असून नबीलाल नोहंमद नदाफ (वय 70) व त्यांची पत्नी अन्वरबी नबीलाल नदाफ (60) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही दुचाकीवरून नातेवाईकांकडे निघाली होती. त्यावेळी दुर्घटना घडली. 

दांपत्याला धडक देत ट्रकचालक हायवेवरुन पसार होण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वाहतूक शाखेचे हवालदार सुरेश सावंत यांनी तत्काळ त्याचा पाठलाग करून तो ट्रक कोयना पुलापलीकडे पकडला. त्यातील क्लीनरला ताब्यात घेतले आहे. एकजण पळून गेला आहे. पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी, कोल्हापूरहून पुण्याकडे भरधाव निघालेल्या ट्रकने महामार्ग ओलांडून शहरात येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य जागीच ठार झाल्याची घटना चारच्या सुमारास घडली. 

महामार्गावर कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर दुचाकीवरून दांपत्य निघाले होते. चारच्या सुमारास कोल्हापूर बाजूने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. घटना घडताच घटनास्थळावरून ट्रकचालकाने पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हवालदार सुरेश सावंत यांनी पाठलाग करून ट्रकसह चालकाला पोलीस ठाण्यात आणले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी बघ्यांची खूप मोठी गर्दी झाली होती.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com