शेतकऱ्याच्या पोराची उत्तुंग भरारी; सातारच्या अनिकेतची लेफ्टनंटपदी निवड

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण सेवेत लेफ्टनंटपदी (वर्ग 1) पिंपरद (ता. फलटण) येथील अनिकेत राजेंद्र शिंदे यांची निवड झाली आहे. देशातील निवड झालेल्या पहिल्या 50 उमेदवारांत श्री. शिंदे यांनी नववा क्रमांक मिळवला आहे. 

श्री. शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरद, तर माध्यमिक शिक्षण सातारा येथील नवोदय विद्यालयात विशेष प्रवीण्यासह झाले आहे. पुण्याच्या उद्यान विद्या महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. यानंतर त्यांची इंडियन मिलिटरी ऍकॅडमी डेहराडून येथे राष्ट्रीय संरक्षण सेवेत लेफ्टनंटपदी निवड करण्यात आली आहे. 

प्रथमपासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या अनिकेत यांचे आई-वडील सर्वसामान्य शेतकरी आहेत. शिंदे कुटुंबातील प्रशासकीय सेवेत उत्तुंग यश संपादन करण्याचा वारसा त्यांनी कायम ठेवला आहे. त्यांचे चुलते धनाजीराव शिंदे हे सध्या जिल्हा कोषागार अधिकारीपदी कार्यरत आहेत. श्री. शिंदे यांच्या या यशाबद्दल त्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com