अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीची बाजी; जांभुळणी पंचायतीच्या सरपंचपदी स्वाती काळेल

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

कुकुडवाड (जि. सातारा) : जांभुळणी ग्रामपंचायतीवर तीर्थक्षेत्र श्री भोजलिंग परिवर्तन पॅनेलने सत्ता खेचून आणली. अकरापैकी सात उमेदवार निवडून आल्यामुळे या पॅनेलच्या स्वाती काळेल यांची सरपंचपदी, तर बापू काळेल यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. 

निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्यामुळे ही निवडणूक मोठ्या अटीतटीने लढली गेली. त्यामध्ये शिदेश्वर काळेल, धनाजी काळेल, सचिन नरळे, बुधाजी काळेल यांच्या नेतृत्वाखाली व अभय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने जांभुळणी ग्रामपंचायतीमध्ये घवघवीत यश मिळवले.

केंद्र सरकारच्याविरोधात, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वंचितची साताऱ्यात धरणे

सरपंचपदासाठी स्वाती काळेल व उपसरपंचपदासाठी बापू काळेल यांचे दोनच अर्ज आल्याने आणि विरोधी गटातील सदस्य अनुपस्थित राहिल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी सत्ताधारी गटाचे सिद्धार्थ तोरणे, सिंधू कोकरे, सुनीता कोकरे, राणी काळेल, कविता सरगर आदी सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. बी. महामुनी यांनी काम पाहिले. ग्रामसेवक बी. एस. बोराटे उपस्थित होते. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com