esakal | जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने विकासकामाला गती; अपशिंगे-देशमुखनगरला अडीच कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला बांधकाम विभागाकडून अडीच कोटी मंजूर झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने विकासकामाला गती; अपशिंगे-देशमुखनगरला अडीच कोटींचा निधी

sakal_logo
By
साहेबराव होळ

गोडोली (जि. सातारा) : सातारा तालुक्‍यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात बोरगावहून अपशिंगेमार्गे (मिलीट्री) देशमुखनगरला जाणारा आठ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णतः उखडला होता. साइडपट्ट्या खचलेल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा असलेले नाले मुजलेले होते. वाहनचालकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत. रखडलेल्या कामाला अनेकांनी विनाकारण खो घातला होता. लोकांची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मध्यस्थी करून अडीच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याला हिरवा कंदील दाखवला व कामाला सुरुवात झाली. 

याबाबत आंबेवाडीचे बाळासाहेब शितोळे व अपशिंगे येथील सुभाष निकम यांनी सांगितले की, आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला बांधकाम विभागाकडून अडीच कोटी मंजूर झाले होते. मात्र, काही शेतकरी व काही संघटनांनी रस्त्याच्या कामाला खो घातला होता. त्यासाठी अजित पवार, मनोज घोरपडे व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधितांना रस्त्याच्या कामातून सर्वांची सोय होणार आहे. या रस्त्यामुळे कोणीही बाधित होत नाही. शिवाय मंजूर झालेला निधी वेळेत खर्च झाला नाही तर निधी परत जाऊ शकतो, ही बाब सर्वांच्या लक्षात आणून दिल्यामुळे अखेर यांत्रिक पद्धतीने ठेकेदाराने रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. 

भाजपच्या आमदाराची सभापती रामराजेंसोबत खलबत्ते; राष्ट्रवादीच्या गोटात चर्चांना उधाण

आठ किलोमीटर लांब, साडेचार मीटर रुंद काही ठिकाणी 3.75 मीटर रुंद, अडीच कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेला रस्ता साइडपट्ट्या भरणे, खडीकरण व डांबरीकरण येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल. कामाचा दर्जा चांगला राहणार आहे. या रस्त्यामुळे अपशिंगे (मिलीट्री), आंबेवाडी, खोजेवाडी, देशमुखनगर या गावांची सोय होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काम मार्गी लावल्याने ग्रामस्थांच्या वतीने नुकताच बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image