esakal | 'पर्यटनवाढीसाठी महाबळेश्वरातील गावांचा वेगळा आराखडा तयार करा'

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News}

महाबळेश्वर तालुक्‍यात तापोळा, पुस्तकांच गाव भिलार, मकरंदगड, उत्वेश्वर यांसारखी अनेक गावे सध्या पर्यटनाची केंद्रे बनत आहेत.

satara
'पर्यटनवाढीसाठी महाबळेश्वरातील गावांचा वेगळा आराखडा तयार करा'
sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर-पाचगणी ही पर्यटनदृष्ट्या सजग शहरे शासन विकसित करीत आहे. परंतु, त्याचबरोबर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील काही गावेही पर्यटनाच्यादृष्टीने उभारी घेत आहेत. या गावांचाही वेगळा आराखडा तयार करून त्यांना वेगळा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. 

पाचगणी येथील एम. आर. ए. सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, पाचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार उपस्थित होते. महाबळेश्वर तालुक्‍यात तापोळा, पार पार, क्षेत्र महाबळेश्वर, तापोळा, पुस्तकांच गाव भिलार, मकरंदगड, उत्वेश्वर यांसारखी अनेक गावे सध्या पर्यटनाची केंद्रे बनत आहेत. त्यामुळे या गावांच्या विकासाचा वेगळा आराखडा बनवून त्यांना निधी प्राप्त झाल्यास ही गावे आणखी सक्षम होऊन वेगळे ग्रामीण पर्यटन उदयास येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. 

Positive Story : प्लॅस्टिकच्या समस्येवर सातारकरांनी शोधला नवा उपाय; युवकांच्या स्टार्टअप प्रयत्नांना मोठं यश

ऍग्रो टुरिझमला मान्यता देण्यात आली होती. ती कमी करण्यात आली आहे. ती आहे तीच ठेवावी यामुळे शेतीपूरक व्यवसाय फायद्याचा होतोय. त्यामुळे पाचगणी-महाबळेश्वरचा भार कमी होणार आहे. हरित लवादाचा प्रश्न चार वर्षे तालुक्‍यात गाजतोय. जे काही निर्बंध लादले जाताहेत, ते स्थानिक व शेतकऱ्यांना अडचणीचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीन व गवतपड या मोकळ्या जागावर निश्‍चितपणे कारवाई होऊ नये तसेच शेतात असणाऱ्या घरांना अनधिकृत धरू नये, असे श्री. भिलारे यांनी सांगितले. 

सत्ताधारी पक्षाचाच आमदार असल्याने शिक्षकांचे प्रश्न सुटणार : जयंत आसगावकर

राज्याने विचारपूर्वक धोरण ठरवून निर्णय घेणे जरुरीचे आहे. जेणेकरून शेतकरी अडचणीत येणार नाही. 
-बाळासाहेब भिलारे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

संपादन : बाळकृष्ण मधाळे