Positive Story : प्लॅस्टिकच्या समस्येवर सातारकरांनी शोधला नवा 'उपाय'; युवकांच्या 'स्टार्टअप' प्रयत्नांना मोठं यश

प्रवीण जाधव
Tuesday, 9 February 2021

प्लॅस्टिकच्या विघटनाच्या समस्येमुळे जगभर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून बायोडिग्रेडेबल (विघटनशील) प्लॅस्टिकच्या म्हणजेच्या कुजणाऱ्या प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठीचे मटेरिअलची निर्मिती झाली.

सातारा : प्लॅस्टिकच्या समस्येवर सातारकरांनी स्टार्टअपच्या माध्यमातून संशोधन करत कुजणारे प्लॅस्टिक मटेरिअल तयार केले आहे. त्यामुळे सध्या आयात कराव्या लागणाऱ्या या मटेरिअलची देशांतर्गत निर्मिती करणे शक्‍य होऊ शकते. 

प्लॅस्टिकच्या विघटनाच्या समस्येमुळे जगभर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून बायोडिग्रेडेबल (विघटनशील) प्लॅस्टिकच्या म्हणजेच्या कुजणाऱ्या प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठीचे मटेरिअलची निर्मिती झाली. परंतु, सध्या असे मटेरिअल परदेशातून आयात करावे लागते. त्यामुळे ते खर्चिक आहे. समस्यांवर उपाय शोधणाऱ्या नवीन स्टार्टअपच्या निर्मितीसाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. त्याचा लाभ घेत येथील करण सुभाष चव्हाण (रा. अपशिंगे, ता. कोरेगाव), इंद्रजित चंद्रकांत निकम (रा. अपशिंगे, ता. सातारा), तेजस दत्तात्रय झगडे (रा. तासगाव, जि. सांगली) यांनी अशा गुणवत्तापूर्ण मटेरिअलच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले आहेत. त्या तिघांनी बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. 

जिहे-कटापूरसह शिवकालीन तळ्यांच्या जीर्णोध्दारासाठी भरघोस निधी देणार; केंद्रीय मंत्र्यांचे उदयनराजेंना आश्वासन

शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे त्यांनी बायोडिग्रेडेबल (विघटनशील) प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठीच्या स्टार्टअपसाठी अर्ज केला होता. त्यामधून त्यांना 53 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. त्यातून बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकची गुणवत्ता वाढवून, किंमत अजून कमी करणे तसेच त्यातून नवनवीन शाश्‍वत उत्पादन तयार करण्याचे उद्दिष्ट त्यांनी घेतले होते. त्यासाठी त्यांनी "टीजीपी बायोप्लॅस्टिक' ही स्टार्टअप कंपनी 2019 मध्ये सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून ही कंपनी कंपोस्टेबल म्हणजेच कुजणाऱ्या प्लॅस्टिकवर संशोधन करत आहे. त्यामध्ये त्यांना यश मिळाले असून, त्यांनी तयार केलेल्या मटेरिअलपासून कुजणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या तयार केल्या जाऊ शकत आहेत. या गटाने इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलाजी अहमदाबाद व लॅबोरेटरी फॉर ऍडव्हान्स पॉलिमेरिक मेटेरिअल भुवनेश्‍वर या ठिकाणी संशोधन केले. 

शरद पवारांनी किती फडांवर जावून कुस्त्या खेळल्या, हेही सांगावं

तसेच अहमदाबाद व पुणे येथील प्लॅस्टिक कंपन्यांमध्ये इंडस्ट्रीयल ट्रायल घेतल्या. या तयार केलेल्या मटेरिअलचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्लॅस्टिक सध्या बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या कंपोस्टेबल प्लॅस्टिकच्या तुलनेमध्ये स्वस्त असून, इतर देशांतून आयात होत असलेल्या कंपोस्टेबल प्लॅस्टिकला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. या कंपनीला राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी, प्रा. महेश पिसाळ, टाटा ट्रस्टच्या सोशल अल्फा या इंक्‍युबेशन सेंटरचे गणेश कवीश्वर, संगम व्हेंचर्सचे कार्तिक चंद्रशेखरन, अरिथ्रा भौमिक, श्रेयसी दास तसेच माया चंद्रशेखरन, वसुदेवन राजेश आणि अभिनव रमारिया या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. 

सरपंचपद आरक्षण : डॉ. आंबेडकरांच्या अधिकारांवर जिल्हाधिकाऱ्यांचे अतिक्रमण; आमदार गोरेंचा घणाघात

लो कार्बन इमिशन एक्‍सलेअर 2020 चे स्पर्धेचे विजेतेपद 

या स्टार्टअप कंपनीच्या प्रयत्नांना लो कार्बन इमिशन एक्‍सलेअर 2020 च्या स्पर्धेचे विजेतेपद मिळाले. दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या "युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन' या डिपार्टमेंटच्या अंतर्गत निसर्गाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी, वातावरणात कमी कार्बन उत्सर्जन करणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यांना काही अनुदान देण्यात येते. भारतातील अशा अनुदानास पात्र कंपन्यांची निवड करण्याची जबाबदारी संगम व्हेंचर्स या कंपनीवरती आहे. याच कंपनीद्वारे असे स्टार्टअप शोधण्यासाठी दरवर्षी "लो कार्बन इमिशन एक्‍सलेटर' ही स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून एकूण 35 स्टार्टअप कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी आठ स्टार्टअपची निवड उपांत्य फेरीमध्ये झाली होती. त्यामध्ये सातारच्या टीजीपी बायोप्लॅस्टिकने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे या युवकांच्या प्रयत्नांना कोंदण मिळाले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Positive News Research On The Problem Of Plastic By The Youth Of Satara